घरमहाराष्ट्रRamdas Tadas : ती महिला आता विरोधकांसोबत; पूजा तडस यांच्या आरोपांवर रामदास...

Ramdas Tadas : ती महिला आता विरोधकांसोबत; पूजा तडस यांच्या आरोपांवर रामदास तडसांचा प्रत्यारोप

Subscribe

भाजपा खासदार आणि महायुतीचे वर्ध्यातील उमेदवार रामदास तडस यांच्या कुटुंबीयांकडून माझ्यावर अन्याय झाला. माझ्या चारित्र्यावर संशय घेतला गेला. तसंच, मला लोखंडी रॉडने मारण्यात आल्याचा आरोप रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी केला आहे. पूजा तडस यांनी यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह पत्रकार परिषद घेत हे गंभीर आरोप केलेत. यानंतर आता रामदास तडस यांनी आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्या महिनेले आता विरोधकांना हाताशी धरलं आहे. निवडणुका आल्याने हा मुद्दा पुन्हा पुढे आला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

वर्धा : भाजपा खासदार आणि महायुतीचे वर्ध्यातील उमेदवार रामदास तडस यांच्या कुटुंबीयांकडून माझ्यावर अन्याय झाला. माझ्या चारित्र्यावर संशय घेतला गेला. तसंच, मला लोखंडी रॉडने मारण्यात आल्याचा आरोप रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी केला आहे. पूजा तडस यांनी यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह पत्रकार परिषद घेत हे गंभीर आरोप केलेत. यानंतर आता रामदास तडस यांनी आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्या महिनेले आता विरोधकांना हाताशी धरलं आहे. निवडणुका आल्याने हा मुद्दा पुन्हा पुढे आला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. (Lok Sabha Election 2024 Wardha Constituency That woman now with the opposition BJP MP Ramdas Tadasa impeached on Pooja Tadasas allegations)

पूजा तडस यांच्या आरोपावर बोलताना रामदास तडस म्हणाले की, निवडणुका आल्या की आरोप होत असतात. माझ्या मुलाची आणि त्या मुलीची न्यायालयात केस सुरू आहे. त्या दोघांनी लग्न केलं हे मला माहीत नाही. त्यानंतर वाद झालेत, ते दोघेही एकमेकांविरोधात न्यायालयात गेले आणि वेगळे झाले. आम्ही आमच्या घरी होतो. माझा त्या मुलीशी काहीही संबंध नाही. आता निवडणूका आल्यामुळे आरोप होत आहेत. पूजा तडस हिने गंभीर आरोप केले असले तरी ती आमच्यासोबत राहत नाही. ती तिच्या नवऱ्यासोबत राहते. त्यांच्यात वाद झाल्यावर दोघेही न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे माझा या प्रकरणी काही देणंघेणे नाही. पुढे काय करायच ते त्यांनी त्याचं पाहावं, असं रामदास तडस म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024: मला लोखंडी रॉडने मारण्यात आलं; रामदास तडस यांच्या सुनेचे गंभीर आरोप

आता विरोधकांना हाताशी पकडून या प्रकरणाचं भांडवल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. न्यायालयात केस सुरू आहे. केस न्यायप्रविष्ठ आहे. दोन वर्ष काहीच आरोप झाले नाहीत. आता निवडणूका आल्यावर आरोप का होत आहेत? दोन वर्ष गुपचूप बसले. दोघेही न्यायालयात जात होते. पण आताच आरोप होत आहेत. तसेच पूजा तडस यांच्या अपक्ष निवडणुकीच्या निर्णयावर बोलताना रामदास तडस म्हणाले की, या देशात सर्वांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी निवडूक लढवावी, आमचा काही विरोध नाही त्यांना. त्यांनी त्यांच्यापद्धतीने निवडणूक लढवावी, असेही रामदास तडस यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

पूजा तडस यांनी काय आरोप केले?

दरम्यान, रामदास तडस कुटुंबावर आरोप करताना पूजा तडस म्हणाल्या की, लग्नानंतर मला एका रुममध्ये ठेवलं. मला उपभोगाची वस्तू म्हणून वापरण्यात आलं. त्यातून बाळाचा जन्म झाला. परंतु खासदार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बाळाची डीएनए चाचणी करण्यास सांगितले. खासदार म्हणतात, मी मुलाला बेदखल केलं आह, मुलाला घरातून काढलं नाही, मग मला एकटीलाच का काढलं घराबाहेर? माझ्याशी राजकारण करता? असे प्रश्न पूजा तडस यांनी उपस्थित केले आहेत. तसेच मी डीएनए चाचणीसाठी तयार आहे. मात्र, माझी विनंती आहे ती न्यायालयाच्या माध्यमातून ती व्हावी. मला दोन वेळचं अन्नही दिलं जात नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करायीच आहे की, ते रामदास तडस यांच्या प्रचार सभेसाठी 20 तारखेला वर्ध्यात येणार आहात. तेव्हा त्यांनी मला दोन मिनिटांचा वेळ द्यावा, जेणेकरून मला न्याय मिळेल, असे पूजा तडस यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : …तरीही सांगलीत जातीयवादी शक्तींना ताकद मिळाली; राऊतांकडून काँग्रेसवर निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -