लोकसभा २०१९ निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. गडचिरोली-चिमूर मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून नागरिकांनी मतदानाला सुरुवात केली आहे. हा मतदारसंघ खुल्या वर्गासाठी राखीव असून येथे एकूण १० लाख २७ हजार ४५४ मतदार आहेत. यामध्ये ४ लाख ८९ हजार ९८० महिला तर ५ लाख ३७ हजार ६७४ पुरुष इतके मतदार आहेत.
