घरमहाराष्ट्रLoksabha 2024: साताऱ्यात वेगळाच पेच; उदयनराजेंनी धुडकावली राष्ट्रवादीची ऑफर; दिल्ली दरबारी निर्णय?

Loksabha 2024: साताऱ्यात वेगळाच पेच; उदयनराजेंनी धुडकावली राष्ट्रवादीची ऑफर; दिल्ली दरबारी निर्णय?

Subscribe

सातारा: लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. परंतु जागावाटपावरून पेच निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. महायुतीतही हीच स्थिती आहे. काही जागांवरून तिढा निर्माण झाला आहे. परंतु साताऱ्यात मात्र वेगळाच पेच असल्याचं समोर आलं आहे. सातारा लोकसभा मतदारसंघावर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितला आहे. (Loksabha 2024 Another embarrassment in Satara Udayanraje Bhosale rejects NCP s offer Delhi court decision)

साताऱ्याचे खासदार राहिलेले उदयनराजे भोसले इथून लढण्यास इच्छूक आहेत. पण सध्या या मतदारसंघात राष्ट्रवादीचा खासदार असल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं साताऱ्यावर दावा केला आहे. राष्ट्रवादीने उदयनराजे भोसले यांना तिकीट देण्याची तयारीदेखील दर्शवली. पण हा प्रस्ताव भोसलेंनी फेटाळला आहे. निवडणूक लढेन तर कमळ चिन्हावरच अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.

- Advertisement -

उदयनराजे शहांची घेणार भेट

साताऱ्याच्या मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचा खासदार असल्यानं ही जागा अजित पवारांच्या पक्षाला सोडण्यात आली आहे. उदयनराजेंनी साताऱ्यातून लढावं, त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव आहे. पण हा पर्याय राजेंनी पूर्णपणे नाकारला आहे. निवडूक लढवेन तर कमळवारच अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. ते उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत.

शिवसेना आणि भाजपाची युती असताना सातारा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे होता. तर, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा उदयनराजे यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Chitra Wagh : गुजरातने मोदींसारखा महान कर्मयोगी पंतप्रधान दिलाय, चित्रा वाघांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -