मुंबई: लोकसभेच्या 2024 च्या आगामी लोकभा निवडणुका लक्षात घेऊन प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी देशातील विरोध पक्षांनी INDIA नावाची आघाडी तयार केली आहे. तर देशपातळीवर NDA सुद्धा आपल्या मित्रपक्षांसोबत कामाला लागलं आहे. तर महाराष्ट्रात भाजपने शिंदे गट आणि अजित पवार गटाला सोबत घेऊन महायुती मजबूत केलीय. आता यावरूनच लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप जोरदार बाजी मारणार असल्याचं दिसत असतानाच, भाजपला मोठा धक्का बसल्याचं दिसून येतय. महायुतीच्या घटक पक्षानं महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, तसंच या पक्षाने स्वबळावर निवडणुका लढणार असल्याची घोषणाही केली आहे. महादेव जानकर यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. (Loksabha 2024 First blow to Grand Alliance Out of alliance announced to contest elections on his own BJP Ajit pawar Group Shinde Group)
महादेव जानकर म्हणाले की, राज्यात आणि देशात आपला पक्ष वाढला पाहिजे, यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून राष्ट्रीय समाज पक्षाकडून जनस्वराज्य यात्रा काढली आहे. विठुरायाच्या दर्शनापासून आम्ही लोकांना जागे करण्यासाठी ही यात्रा काढत आहोत. अलीकडेच एनडीएची बैठक झाली त्यात आम्हाला निमंत्रण देण्यात आले नव्हते. सुरुवात त्यांची आहे. आम्हाला एनडीए असो वा इंडिया कोणी बैठकीला निमंत्रण केलं नाही. त्यामुळे आपण स्वत: पुढे चालले पाहिजे. भीक मागून हक्क मिळत नाही. सत्ता घ्यायची असेल तर स्वत: च्या हिमतीवर घेतली पाहिजे असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत मोठा मासा छोट्या, तसे मोठा पक्ष छोट्या पक्षांना खातो, त्यामुळे छोट्या पक्षानेही मला मोठे व्हायचे आहे हे ठरवले पाहिजे. आता रासपाने मोठं व्हायचं ठरवले आहे. या देशात भाजप, काँग्रेस मोठे पक्ष आहेत. त्याचा फायदा आपल्या पक्षाने घेतला तर उद्या महाराष्ट्रात येणारे चित्र बदलेलं. ही आमच्यासाठी संधी म्हणून पाहत आहे. पक्ष वाढवल्याशिवाय ही मंडळी आम्हाला विचारणार नाहीत. भाजपाला माझी, राजू शेट्टी, विनायक मेटे, रामदास आठवले यांची गरज होती. आता ती गरज वाटत नाही. त्यामुळे आपली ताकद वाढवली पाहिजे, अशी भूमिका माजी मंत्री महादेव जानकर यांनी मांडली आहे आहे.
( हेही वाचा: राहुल शेवाळे बदनामी प्रकरण; उद्धव ठाकरे- संजय राऊत यांना जामीन )