घरमहाराष्ट्रLoksabha 2024 : "एका महिन्यात काय जुगाड, जुळवणी करायची ती करा; जयंत...

Loksabha 2024 : “एका महिन्यात काय जुगाड, जुळवणी करायची ती करा; जयंत पाटील यांचे सूचक विधान

Subscribe

शासन आपल्या दारी ही योजना जनतेची फसवणूक करणार आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

सातारा : एका महिन्यात काय जुगाड, जुळवाणी करायची असेल ती मतदारसंघातील बूथपर्यंत जाऊन करायचे ते करा आणि जागृत राहा, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुका एकत्र जाहीर झाल्या, तर आश्चर्य वाटून घेऊ नका आणि ढिले राहू नका, असे आवाहन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. या साताऱ्यातील कोरेगावमध्ये जयंत पाटील यांची सभा पार पडली.

जयंत पाटील म्हणाले, “कार्यकर्त्यांनी वेळ, कष्ट करून बूथपर्यंत जाऊन प्रचार करणारी यंत्रणा आपण उभी केली, तर 100 टक्के आपला विजय होईल. यासाठी सगळ्यांनी आगामी निवडणुकांसाठी प्रयत्न करा. लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुका एकत्र जाहीर झाल्या, तर आश्चर्य वाटून घेऊ नका आणि ढिले राहू नका. आपल्याकडे आता फक्त एका महिन्याचा वेळ आहे. एका महिन्यात काय जुगाडा जुळवणी मतदारसंघात जाऊन करायची असेल, तर ती करा, जाग रूक राहा. लोकसभा आणि विधानसभा एकत्र लागल्या तरी, आपली तयारी पाहिजे. ही भूमिका ठेवून कामाला लागा.”

- Advertisement -

हेही वाचा – Nilesh Rane On Jadhav : भास्कर जाधव यांच्या टीकेवर निलेश राणेंचे प्रत्युत्तर; “जनतेने मला स्वीकारले नाही तरी…”

सरकारही योजना जनतेची फसवणूक करणारी

जयंत पाटील यांनी कराड येथील उंब्रजमधील सभेतून सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमावर टीका केली आहे. जयंत पाटील म्हणाले, “शासन आपल्या दारी ही योजना जनतेची फसवणूक करणार आहे. हा भाजपाचा इव्हेंट करणारी आहे. हा उपक्रम राबवायचा असेल, तर तहसीलदारांनी सर्व सामान्यांच्या दारात जाऊन योजना राबविणे गरजेचे आहे.”

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -