घरमहाराष्ट्रLoksabha Election 2023: संजय राऊत सांगत असलेल्या जागांवर शिंदे गटाचाही दावा

Loksabha Election 2023: संजय राऊत सांगत असलेल्या जागांवर शिंदे गटाचाही दावा

Subscribe

शिवसेना, शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसााई यांनी म्हटलं की, दावा करत असताना राऊत हे विसरतात की त्यावेळी शिवसेना एक होती. आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्थापन झाल्यापासून तुमच्या 19 खासदारांमधील 13 खासदार हे शिंदेंकडे गेले आहेत. त्यामुळे तुम्ही 19 जागा कशा काय लढवू शकता, असं म्हणत देसाई यांनी राऊतांना विश्वप्रवक्ता म्हणत खोचक टोला लगावला आहे. 

लोकसभा निवडणूक 2023 च्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसह विरोधकही जोरदार तयारी करत आहेत. या तयारीसाठी काही रणनीती आखल्या जात आहेत. अनेक जण जागा लढवण्यावरुन दावे प्रतिदावे करताना दिसतायत. अशातच  ठाकरे गटाचे नेते  आणि खासदार संजय राऊत यांनी 2019 ला आमचे 19 खासदार निवडून लोकसभेत गेले होते आता पुन्हा  आम्ही 19 जागा लढवणार असल्याचं सांगतिलं. त्यावरुन आता या जागांवर ठाकरे गटानेही दावा केला आहे. ( Loksabha Election 2023 Shinde group also claims the seats claimed by Sanjay Raut )

शिवसेना, शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसााई यांनी म्हटलं की, दावा करत असताना राऊत हे विसरतात की त्यावेळी शिवसेना एक होती. आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्थापन झाल्यापासून तुमच्या 19 खासदारांमधील 13 खासदार हे शिंदेंकडे गेले आहेत. त्यामुळे तुम्ही 19 जागा कशा काय लढवू शकता, असं म्हणत देसाई यांनी राऊतांना विश्वप्रवक्ता म्हणत खोचक टोला लगावला आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीत जागावाटपावरुन मतभेद

उद्धव ठाकरेंनी सिल्व्हर ओकवर जाऊ शरद पवारांची भेट घेतल्यानंतर 16-16 जागांचं वाटप असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर संजय राऊत 19 जागांवर आम्ही लढणार असल्याचं म्हणाले. आता जागावाटपावर मविआचं एकमत होणार नाही, हे मी लिहून देतो.

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. कोर्टाचे जे काही अडथळे होते ते दूर झालेले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करतील, असा विश्वास शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

( हेही वाचा: Sameer Wankhede : वानखेडे प्रकरणात भाजपा पूर्ण बुडालाय, ठाकरे गटाचा हल्लाबोल )

केजरीवालांच्या भेटीवरुन टोला

मातोश्रीवरुन उठून जसं उद्धव ठाकरेंना जावं लागलं तसं मुंबईतून उठून केजरीवालांची भेट घ्यायला दिल्लीला जावं लागलं नाही, ते एक बंरय असं म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला. केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत तसचं, ठाकरेही राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. आता ते कोणत्याही पक्षाचे प्रमुख नसले तरीही ते एका समुहाचं नेतृत्त्व करतायत त्यामुळे ते भेटत असतील. तसचं, देशभरातील सगळे विरोधक मोदींविरोधात एकत्र येतायत. परंतु त्याचा फारसा काही परिणाम होणार नाही. मोदींचं नेतृत्त्व मोठ्या प्रमाणात जागितक स्तरावर आहे, असही शंभूराज देसाई यावेळी म्हणाले. देशानं मोदींचं आणि महायुतीचं आव्हान स्वीकारल्याचंही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -