Homeमहाराष्ट्रLoksabha Election 2024: महायुतीत धुसफूस? 'हा' मतदार संघ यंदाही गाजणार

Loksabha Election 2024: महायुतीत धुसफूस? ‘हा’ मतदार संघ यंदाही गाजणार

Subscribe

अहमदनगर:लोकसभा 2024 च्या निवडणुकांचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. प्रत्येक पक्ष या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामाला लागला आहे. महाराष्ट्रातही सर्व पक्षांनी कंबर कसली आहे, असं असतानाच अहमदनगर लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस असल्याचं म्हटलं जात आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघ हा उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. सहकाराचा जिल्हा अशी या मतदारसंघाची ओळख आहे. परंतु येथे उमेदवारावरून पेच निर्माण झाल्याचं दिसत आहे. (Loksabha Election 2024 Fraud in Grand Alliance Ahmednagar Lok Sabha Constituency will be famous this year too)

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले विखे कुटुंबातील डॉक्टर सुजय विखे पाटील हे करतात. काँग्रेसमधून भाजपामध्ये आल्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या लोकसभा मतदारसंघात भाजपाला मजबूत स्थान मिळवून दिलं आहे. यापूर्वी देखील या लोकसभा मतदारसंघात भाजपाला स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या माध्यमातून खासदार लाभले. मात्र सुजय विखे यांनी केवळ लोकसभा मतदारसंघातच नाही तर दिल्लीत देखील भाजपाचे वजन निर्माण केले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे संग्राम जगपात यांचा 2 लाख 81 हजार 474 मतांनी पराभव केला होता.

सुजय विखे पाटील यांचा दावा जरी मजबूत असला तरीही या जागेवर अहमदनगर आमदार राम शिंदे यांनी देखील या निवडणूक लढण्यासाठी इच्छूक असल्याचं म्हटलं आहे. तर महायुतीत असलेले पारनेर नगर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार निलेश लंके आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत रस्सीखेच असल्याचं दिसून आलं आहे.

(हेही वाचा  Shambhuraj Desai : मुख्यमंत्र्यांवरील टीकेवरून शंभुराज देसाईंचा राऊतांना इशारा, म्हणाले… )