कोल्हापूर : अजित पवार गट कर्जत येथे दोन दिवसीय मंथन शिबिर आयोजित करण्यात येते. भाजपाला अनिल देशमुख हे मंत्रिपदी नको होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी शिबिरात केला आहे. बारामतीत गृहकलचा प्रश्न नाही. आम्हाला नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी प्रामाणिक राहवेच लागेल, अशी भूमिका वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडली.
लोकसभा निवडणुकीत बारामती अजित पवार गट लढणार, यासंदर्भात हसन मुश्रीफ म्हणाले, जिथे आमचे खासदार आहेत. त्या जागांवर आम्ही लढणार आहोत. यात बारामतीचा देखील समावेश आहे. बारामतीत गृहकलचा प्रश्नच येत नाही. आम्हाला नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी प्रामाणिक राहवेच लागेल, असे हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात बोलताना सांगितले.
हेही वाचा – Sharad vs Patel : लोक पक्ष सोडून कसे जातात, यावर त्यांनी पुस्तक लिहावं; शरद पवारांचा पटेलांना टोला
अनिल देशमुखांनी इतके खोटे बोलू नये
अनिल देशमुख भाजपाला मंत्रिपदी नको होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी कर्जतमध्ये झालेल्या शिबिरानंतर पत्रकार परिषदेत केला. यावर हसन मुश्रीफ म्हणाले, आमच्यासोबत अनिल देशमुख होते. यानंतर त्यांनी आमच्यासोबत येण्यास नकार दिला. अनिल देशमुखांनी इतके खोटे बोलू नये आणि अजित पवारांना सुपारी देण्याचा प्रश्न येऊ नये.”
हेही वाचा – Rajesh Tope: राजेश टोपेंच्या गाडीची अज्ञातांकडून तोडफोड; जालन्यात नेमकं काय घडलं?
ज्या पक्षासाठी कष्ट करून वाढवला
अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर दुसरा पक्ष काढा, असे आव्हान जितेंद्र आव्हाडांनी केल्यावर हसन मुश्रीफ म्हणाले, “ज्या पक्षात इतकी वर्ष काम केले, तो पक्ष सोडून दुसरा पक्ष कसा काढणार? ज्या पक्षासाठी कष्ट करून वाढवला, त्याबाबत वेगळ्या भावना असतात.