घरमहाराष्ट्रLoksabha Election 2024 : रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग जागा भाजपाचीच, राणेंची शिंदे गटाला चपराक

Loksabha Election 2024 : रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग जागा भाजपाचीच, राणेंची शिंदे गटाला चपराक

Subscribe

मुंबई : येत्या पंधरा दिवसांत लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपांची चर्चा सुरू झाली आहे. महायुती आणि मविआमध्ये मात्र विविध जागांवरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग जागा भाजपाचीच असल्याचे सांगून केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शिंदे गटाला चपराक दिली आहे.

हेही वाचा – Uday Samant : आमच्या जागा आम्हाला द्या; शिवसेनेची भूमिका

- Advertisement -

येत्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ‘अब की बार 400 पार’ अशी घोषणा दिली आहे. तर, त्यांना रोखण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत ‘इंडिया’ या आघाडीची स्थापना केली आहे. सध्या इंडियामध्ये कुरबूर सुरू असली तरी, राज्यात महाविकास आघाडीतील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच काँग्रेस या घटक पक्षांनी एकत्र राहण्याचे ठरविले आहे. त्यातच मविआने प्रकाश आंबेडकर यांच्या बंचित बहुजन आघाडीचाही समावेश केला असून सध्या त्यांच्यात जागावाटपाची चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

महायुतीतही दावे-प्रतिदावे सुरू आहेत. बारामती, सातारा, शिरुर आणि रायगड चार जागा लढविणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच जाहीर केले आहे. तर, आमच्या जागा आम्हालाच हव्या, अशी आग्रही भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने घेतली आहे. पण त्यातील काही जागांवर भाजपाने दावा केला आहे. त्यापैकी एक रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग ही जागा आहे. मी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगणार आहे की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग असेल किंवा जिथे जिथे पूर्वी शिवसेने ज्या जागा लढविल्या त्या जागेवर शिवसेनेचाच दावा आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Maharashtra Politics: माझा प्रचार धनंजय मुंडे करणार? पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य

मात्र, शिवसेनेचा या जागेवारील दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी फेटाळून लावला आहे. लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षांचे बरेच नेते रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्‍या जागेसंबंधी आपला हक्‍क दाखवित आहेत. पण रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भाजपाची असून भाजपाच ती लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Maharashtra Budget Session : महिलांना साडी नाही तर शस्त्र द्या, अर्थसंकल्पाच्या चर्चेत वडेट्टीवारांनी सरकारला सुनावले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -