घरमहाराष्ट्रपुणेLoksabha Election : पुणे लोकसभेसाठी मनसेकडून बाबर यांना पसंती? शर्मिला ठाकरेंचं सूचक विधान

Loksabha Election : पुणे लोकसभेसाठी मनसेकडून बाबर यांना पसंती? शर्मिला ठाकरेंचं सूचक विधान

Subscribe

मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकही उमेदवार उभा केला नव्हता. मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभर मोदी-शहांविरोधात सभा घेतल्या होत्या. मोदी- शहा या दोघांना राजकीय पटलावरुन काढल्याशिवाय देश वाचणार नाही असा रोख त्यांच्या भाषणातून होता.

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी प्रत्येक पक्षाने सुरू केली आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मागे नसून, मनसेकडूनही मोर्चेबांधणी केली जात आहे. अशातच पुणे लोकसभेसाठी आग्रही असलेले मनसेचे नेते वसंत मोरे आणि साईनाथ बाबर या दोघांपैकी कुणाला उमेदवारी मिळते याबाबत चर्चा रंगत असतानाच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात साईनाथ बाबर यांच्याविषयी सूचक विधान केलं आहे. तेव्हा मनसेचे नेते साईनाथ बाबर यांना उमेदवारी मिळते का? हे पहावे लागणार आहे. (Loksabha Election Babar preferred by MNS for Pune Lok Sabha Indicative statement by Sharmila Thackeray)

मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकही उमेदवार उभा केला नव्हता. मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभर मोदी-शहांविरोधात सभा घेतल्या होत्या. मोदी- शहा या दोघांना राजकीय पटलावरुन काढल्याशिवाय देश वाचणार नाही असा रोख त्यांच्या भाषणातून होता. दरम्यान आता आगामी लोकसभेचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असून, मनसेकडूनही लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यातच मनसेने पुण्यावर लक्ष केंद्रीत केलं असून, आगामी निवडणुकीत मनसे पुणे लोकसभा लढविण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे बाबर यांच्याबद्दल?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. याच दरम्यान पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शर्मिला ठाकरे यांनी मनसेचे नेते साईनाथ बाबर यांच्याबद्दल सूचक विधान केलं आहे. त्या म्हणाल्या की, साईनाथ बाबर यांना मला उच्च पदावर बघायचं आहे. त्यांना आता महापालिकेत पाठवायचे नाही. त्यांना दिल्लीत पाठवले तर दुधात साखर पडेल. शर्मिला ठाकरे यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

हेही वाचा : Nilesh Rane On Jadhav : भास्कर जाधव यांच्या टीकेवर निलेश राणेंचे प्रत्युत्तर; “जनतेने मला स्वीकारले नाही तरी…”

- Advertisement -

याचवेळी शर्मिला ठाकरे यांनी कुणाचेच नाव न घेता सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्या म्हणाल्या की, कोरोना काळात जेव्हा सत्ताधारी घरात बसले होते तेव्हा मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन काम करत होते. असे म्हणत शर्मिला ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांचं कौतुक केलं.

हेही वाचा : IND vs ENG Test : उर्वरित सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा! विराटच्या पुनरागमनावर द्रविड म्हणाले…

मग वसंत मोरे यांच्यावर कोणती जबाबदारी?

पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे नेहमीच र्चेत असतात. त्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणूनही ओळख आहे. मोरे यांनीसुद्धा अनेकवेळा खासदारकीबाबत आपण इच्छूक असल्याचे बोलून दाखविले होते. असे असतानाच शर्मिला ठाकरे यांनी केलेल्या सूचक वक्तव्यानंतर साईनाथ बाबर यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा रंगत असताना मग वसंत मोरे यांच्यावर कुठली जबाबदारी दिली जाणार हे पहावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -