घरमहाराष्ट्रLoksabha Election: महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटेना; काँग्रेस-शिवसेनेमध्ये टक्कर

Loksabha Election: महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटेना; काँग्रेस-शिवसेनेमध्ये टक्कर

Subscribe

महाविकास आघाडीची 2 फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत प्रकाश आंबेडकर जाणार आहेत

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक हे सर्व पक्ष कामाला लागले आहे. महाविकास आघाडी 30 जानेवारीला जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. पण महाविकास आघाडीकडून अद्यापही जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. या बैठकीत 8 जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेस दावा करत आहे. यात दोन्ही पक्षाकडून 8 जागांवर एकमत नसल्यामुळे जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही.

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. यात महाविकास आघाडीचे तीन पक्ष लोकसभेच्या 48 पैकी 40 जागांवर एकमत झाले आहे. पण 8 जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटाचा तिढा कायम आहे. कारण या 8 जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेस दोघांकडून दावा केला जात आहे.

- Advertisement -

ठाकरे आणि काँग्रेसकडून 8 जागांवर दावा

  • हिंगोली – शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील
  • वर्धा – भाजपचे खासदार रामदास तडस
  • भिवंडी – भाजपचे खासदार कपिल पाटील
  • जालना – भाजपचे खासदार रावसाहेब दानवे
  • शिर्डी – शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे
  • मुंबई दक्षिण मध्य – शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार राहुल शिवाळे
  • मुंबई उत्तर पश्चिम – शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर
  • रामटेक – शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने

हेही वाचा – Budget 2024 : सत्ताधाऱ्यांसाठी आशादायी तर विरोधकांना नावीन्य नसलेला वाटतोय अर्थसंकल्प

वंचित 12 जागांबाबत मविआला विचारणार

महाविकास आघाडीत शेकाप, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी आणि कम्युनिस्ट पाटीचा समावेश झाला आहे. यात वंचित बहुज आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना समावेश करण्याच्या चर्चा सुरू होत्या. पण महाविकास आघाडीची 30 जानेवारीला झालेल्या बैठकीत वंचितला निमंत्रण दिले होते. या बैठकीला प्रकाश आंबेडकरांऐवजी वंचितचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर हे गेले होते. पण पुंडकर बैठकीत सहभागी करून घेतले नव्हते. यात अखिल भारतीय काँग्रेस कमिती अर्थात एआयसीसीची मान्यात आल्यावर वंचित महाविकास आघाडीचा भाग असे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. महाविकास आघाडीची 2 फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत प्रकाश आंबेडकर जाणार आहेत आणि वंचितच्या 12 जागांच्या फॉर्म्युल्यावर त्यांना विचारणार करणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -