घरताज्या घडामोडीपावसाळी पिकनिक नडली; १२ पर्यटकांवर कारवाई

पावसाळी पिकनिक नडली; १२ पर्यटकांवर कारवाई

Subscribe

पावसाळ्यात लोणावळा फिरण्यास गेलेल्या १२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येते दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक पर्यटन ठिकाणांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. मात्र, असे असताना देखील पावसाळ्यात पिकनिकला गेलेल्या मंडळींना पावसाळी पिकनिक चांगलीच महागात पडली आहे. लोणावळा परिसरात १२ पर्यटक फिरण्यास गेले होते. त्या पर्यटकांवर लोणावळा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यासोबत मास्क न लावता फिरणाऱ्या २३ जणांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

११ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

लोणावळ्यात आतापर्यंत फिरण्यास गेलेल्या ३५ पर्यटकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. ३५ लोकांकडून ११ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून पर्यटक बंदी असताना सुद्धा पर्यटक येत असल्यामुळे लोणावळ पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.

- Advertisement -

पावसाळा सुरु झाला की मुंबई, पुण्यातील अनेक पर्यटक लोणावळा फिरण्यास येतात. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे. याच दरम्यान काहीजण नियमांचे उल्लंघन करत फिरण्यास येणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत न येण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा – ‘किस डे’निमित्त जाणून घ्या किसचे प्रकार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -