घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचल्याची खोटी माहिती देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

मुख्यमंत्री शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचल्याची खोटी माहिती देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट रचल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षास मिळाली होती. तेव्हापासून मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचल्याची माहिती खोटी असल्याचे समोर आले असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. खोटी माहिती देणाऱ्या या व्यक्तीविरोधात लोणावळा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अविनाश आप्पा वाघमारे ( (वय-३६, रा. रमाबाई आंबेडकर नगर, साठे चाळ, घाटकोपर, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस कॉन्स्टेबल अक्षय वायदंडे यांनी फिर्याद दिली आहे.

लोणवळा शहर पोलिसांच्या माहितीनुसार, आरोप अविनाश वाघमारे याचे आज (2 ऑक्टोबर) दुपारी 2.45 च्या सुमारास पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गालगतच्या वळवन येथील हॉटेल साई कृपा (एनएच ४) येथील मॅनेजर किशोर पाटीलसोबत वाद झाला होता. पाण्याच्या बाटलीची किंमत जास्त लावल्यावरून हा वाद झाला होता. यावेळी हॉटेल मॅनेजर आणि कर्मचाऱ्यावरील राग मनात धरून त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने आरोपी अविशाने आपल्या मोबाईलवरून पोलीस नियंत्रण कक्षास 100 नंबरवर कॉल केला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा प्लॅन चालू असल्याची खोटी माहिती दिली.

- Advertisement -

यावेळी महाराष्ट्रभर दौऱ्यानिमित्त जाणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. यावेळी पोलीस यंत्रणेसह गुप्तचर यंत्रणाही अलर्ट मोडवर आले, कारण यापूर्वीही मुख्यमंत्री शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पत्र आणि फोनवरून या धमक्या मिळत होत्या. मात्र रविवारी घडलेली हे धमकीचे प्रकरण खोटे असल्याचे समोर आले असून खोटी माहिती पसरवणाऱ्या अविनाश वाघमारेला लोणावळा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात आता पोलीस कारवाई सुरु आहे.


‘बिग बॉस मराठी 4’ च्या घरात ‘या’ कलाकारांची एन्ट्री, पाहा स्पर्धकांची पूर्ण लिस्ट

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -