Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नीलम राणे, आमदार नितेश राणे यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस

नीलम राणे, आमदार नितेश राणे यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस

हे सर्क्यूलर पुणे पोलिसांनी काढले आहे. पण आमचे डीएचएफएलचे खाते मुंबई ब्रँचमध्ये आहे.

Related Story

- Advertisement -

‘डीएचएफएल’ कर्ज प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुणे पोलिसांकडून लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली. कंपनीकडून घेतलेले ६५ कोटींचे कर्ज थकवल्याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने ही नोटीस पाठवली आहे.

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने तक्रार नोंदवली होती. आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने २५ कोटींचे कर्ज घेतले होते. तर नीलम राणे या आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडच्या सहअर्जदार होत्या. या कर्जाची परतफेड न केल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती.

- Advertisement -

याचबरोबर नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने डीएचएफएल कडून ४० कोटींचे कर्ज घेतले होते आणि त्याची देखील ३४ कोटींपर्यंत थकबाकी आहे. डीएचएफएल संबंधित एजन्सीकडे याप्रकरणी तक्रार केली होती. त्यांनंतर पुणे पोलिसांनी ही लुकआऊट नोटीस जारी केलेली आहे.

३ सप्टेंबर रोजी ही लुकआऊट नोटीस पाठवली गेली आहे. हे पत्र छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाला देखील पाठवलेले आहे. मात्र, लुकआऊट नोटीस जारी होणे म्हणजे आरोपी आहे असे होत नाही. तरी देखील या लुकआऊट नोटीसवर आता राणे कुटुंबियांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

पुणे गुन्हे शाखा आयुक्तांचे असे म्हणणे आहे की, आमच्याकडे तक्रार आली होती व त्यानंतर संबंधित न्यायालयाकडून आदेश आल्यानंतर लुकआऊट नोटीस जारी केली गेली आहे. आम्ही नियमांचे पालन केले आहे व नियमाप्रमाणे जी थकबाकी आहे ती पाहता डीएचएफएलकडून तक्रार करण्यात आली होती.

हे सर्क्यूलर पुणे पोलिसांनी काढले आहे. पण आमचे डीएचएफएलचे खाते मुंबई ब्रँचमध्ये आहे. त्यामुळे पुणे क्राईम ब्रँचला हा अधिकार कसा?, तसेच आम्ही ५ महिन्यांपूर्वी संबंधित बँकेला आम्हाला लोन सेटल करायचे आहे, असे अधिकृत पत्र दिलेले आहे. त्यामुळे अशा नोटिसीला उपयोग नाही. त्यामुळे या प्रकरणात आम्ही हायकोर्टात जाऊन आव्हान देणार आहोत. नारायण राणेंच्या कुटुंबाच्या अडचणी नाही तर आता क्राईम ब्रँचची अडचण होणार, महाविकास आघाडीची अडचण होणार आहे.
-नितेश राणे, आमदार, भाजप.

- Advertisement -