घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगुंगीचे औषध असलेले लाडू खाऊ घालून रेल्वे प्रवाश्यांची लूट

गुंगीचे औषध असलेले लाडू खाऊ घालून रेल्वे प्रवाश्यांची लूट

Subscribe

नाशिक : रेल्वे प्रवासात लाडूमध्ये गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटणार्‍या उत्तरप्रदेशमधील भामट्याला भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी मनमाड-नाशिकरोडदरम्यान अटक केली. मिश्रीलाल द्वारकाप्रसाद मौर्य (रा. भावैरनगर, ता. गौडा. जि. उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, चार जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास जळगाव स्टेशनच्या प्लॅटफॉर्म दोनवरुन मुंबईकडे जाणार्‍या रेल्वेत शिवदास रामचंद्र पाटील (वय ६७, रा. चिंचोली, नेरल, ता. कर्जत, रायगड) हे गितांजली एक्स्प्रेसमध्ये बसले होते. त्यावेळी पाटील यांच्या शेजारील सहप्रवाशाने विश्वासात घेऊन त्यांना साबुदाना चिवडा व लाडू खाण्यास दिला. तो खाल्यानंतर पाटील बेशुद्ध झाले. त्यानंतर संशयित आरोपीने त्यांच्या हाताच्या बोटातील ९२ हजाराच्या सोन्याच्या अंगठ्या, टॅबलेट व रोकड असा १ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

- Advertisement -

५ जानेवारी रोजी पाटील हे शुद्धीवर आले तेव्हा सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यांच्या जवळील सोन्याच्या अंगठ्या व रोकड चोरी गेल्याचे त्यांनी समजले. सीसीटीएनएसच्या माध्यमातून भुसावळ विभागात तक्रार तपासासाठी वर्ग करण्यात आली. त्यानुसार रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक बैनी प्रसाद मीना यांच्या आदेशाने अरुण कुमार व सागर वर्मा यांना रविवारी (दि.२२) पहाटे १.३० वाजता मडगांव स्पेशल रेल्वे गाडीत मनमाड ते नाशिकरोड दरम्यान मिश्रीलाल द्वारकाप्रसाद मौर्य या संशयिताला ताब्यात घेत कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने ४ जानेवारी रोजी लाडूत गुंगीचे औषध टाकून लूट केल्याचे कबुल केले. याप्रकरणी त्याला भुसावळ मुख्यालयात पाठवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -