घरताज्या घडामोडीगृहमंत्र्यांची न्यायालयीन चौकशी गरजेची, नैतिकतेने राजीनामा द्यावा - फडणवीस

गृहमंत्र्यांची न्यायालयीन चौकशी गरजेची, नैतिकतेने राजीनामा द्यावा – फडणवीस

Subscribe

सचिन वाझेंना १०० कोटींचे टार्गेट हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडूनच देण्यात आले होते, असा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलिस अधिकारी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिणे ही घटना म्हणजे कळस आहे. म्हणूनच या सगळ्या प्रकरणानंतर गृहमंत्री अनिल देशमुख या पदावर राहू शकत नाही. नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा. तसेच मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेण्याची गरज असल्याची मागणी राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अनिल देशमुख यांची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी व्हावी किंवा न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. जोवर दुध का दुध होत नाही तोवर गृहमंत्र्यांनी या पदावर राहू नये अशीही मागणी फडणवीस यांनी केली.

मुंबईचा पोलिस आयुक्त हा राज्याच्या गृहमंत्र्यावर बोट ठेवण्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहितो हा सगळा विषय महाराष्ट्राला मान खाली घालणारा आहे. तसेच राज्याच्या पोलिस दलाला बदनाम करण्याचा प्रकार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळेच तथ्य बाहेर येईपर्यंत गृहमंत्री पदावर राहू नये असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्याच्या गृहमंत्र्यांवर हे सगळे आरोप राज्याचा सर्व्हींग महासंचालक करतो आहे हे गंभीर असल्याचे ते म्हणाले. म्हणूनच या प्रकरणात अत्यंत कडक कारवाई होणे गरजेचे आहे असे मत फडणवीस यांनी मांडले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला आहे तो अत्यंत गंभीर आरो आहे. म्हणूनच या प्रकरणाचे गांभीर्य खूप आहे.

- Advertisement -

या संपुर्ण प्रकरणात परमबीर सिंह यांनी एका चॅटचा उल्लेख केला आहे. म्हणूनच ही चॅट जोडली, तर पुरावा तपासणे गरजेचे आहे. हे सगळे प्रकरण गंभीर अशा प्रकारचे आहे. म्हणून गृहमंत्र्यांनी उत्तर देण्याएवजी नैतिक भूमिकेने राजीनामा द्यावा. मुख्यमंत्र्यांनी एक्शन घेऊन ते बोलत असतात असे सांगतात तर अनिल देशमुख यांच्या बाबतीत त्यांनी हे सगळे कृतीत आणावे असेही फडणवीस म्हणाले. सरकार वाचवण्याच्या नादात, सरकार जाऊ शकत याचा संशय आल्याने दुर्लक्ष करण्याचे काम होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्य धोक्यात टाकण्याचे काम गृहमंत्री करत आहेत, म्हणून त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -