Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Covid vaccination : ...तर कोरोनाने मेलेली लोकं वाचवता आली असती - दरेकर

Covid vaccination : …तर कोरोनाने मेलेली लोकं वाचवता आली असती – दरेकर

Related Story

- Advertisement -

केंद्रावर मिडियातून टीका करायची हेच काम सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आले. यातील जास्तीत जास्त वेळ नियोजनासाठी देण्याची गरज होती. पण ते न करता फक्त केंद्रावर आरोप करण्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा वेळ गेला. वेळीच जर आवश्यक ऑक्सिजन साठा, रेमडेसिवीर आणण्यासाठी व्यवस्था केली असती आढावा घेतला असता नियोजन केले असते तर ही अवस्था निर्माण झाली नसती, असे मत राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली. अपुऱ्या सुविधांअभावी लोकांचे गेलेले प्राण वाचवता आले असते असेही ते म्हणाले. केंद्रावर आरोप करण्याशिवाय आघाडी सरकारकडे काही कामच उरलेले नाही. त्याएवजी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्यापुरत काम केले असते तर निदान आपल्या जिल्ह्यापुरते केले असते तरीही मोठा बदल झाला असता. किमान सध्याची परिस्थिती ओढावली नसती असे दरेकर म्हणाले. आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मोफत लसीकरण मोहीमेच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारला पुर्णपणे पाठिंबा देणार असल्याचेही स्पष्ट केले.

महाविकास आघाडीतील पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. तसेच केंद्रातही मंत्रीपद त्यांच्याकडे होते. प्रशासनाचा चांगला अनुभव त्यांच्याकडे होता. त्यांनी आपल्या सातारा जिल्ह्यात जरी ठाण मांडून व्यवस्था केली असती तरीही आरोग्य व्यवस्थेचे असे हाल झाले नसते, अशी टीका दरेकर यांनी केली. प्रत्येक पालकमंत्र्यांनी वेळीच आपल्या जिल्ह्यापुरते नियोजन केले असते तर रेमडेसिवीर, ऑक्सिजन साठा, वेंटीलेटर अभावी हे प्राण गेले नसते असे मत दरेकर यांनी व्यक्त केले. लॉकडाऊनवर बोलताना लॉकडाऊन हा अंतिम पर्याय नसल्याची पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेली आठवण प्रवीण दरेकर यांनी करून दिली.

- Advertisement -

राज्यात लसीकरणाच्या मोहीमेवर बोलताना लसीकरण प्रक्रिया लांबणे ही राज्यासाठी चांगली गोष्ट नाही असे दरेकर यांनी स्पष्ट केले. राज्यात लस उपलब्धततेनुसार लसीकरण मोहीम सुरू असायला हवी. साठा आल्यावरच लसीकरण मोहीम सुरू करणे हे राज्यातील नागरिकांवर अन्यायकारक ठरेल असे दरेकर म्हणाले. आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन लसीकरण मोहीमेला सहकार्य करणार आहोत असे त्यांनी सांगितले. एकीकडे लस मोफत केल्याचे जाहीर केले तर दुसरीकडे लस उपलब्ध नाही, अपुरी आहे अशा महाराष्ट्रात तक्रारी आहेत. महापालिका आयुक्तांकडूनही लस उपलब्धततेशिवाय लसीकरण मोहीम चालवणार नाही अशी भूमिका योग्य नसल्याचेही दरेकर म्हणाले.

- Advertisement -