घर क्राइम Love Jihad : लव्ह जिहादच्या संशयावरून तरुणाला मारहाण; सोलापूरमधील घटना

Love Jihad : लव्ह जिहादच्या संशयावरून तरुणाला मारहाण; सोलापूरमधील घटना

Subscribe

 

सोलापूरः Love Jihad लव्ह जिहादच्या संशयावरुन तरुणाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर येथे घडला आहे. महत्त्वाचे म्हणजे पीडित महाविद्यालयीन तरुण दुसऱ्या धर्मातील तरुणीशी बोलायचा, या कारणावरुन त्याला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्यांपैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरु आहे.

- Advertisement -

सोलापूर येथील एम्प्लॉयमेंट चौकात ही घटना घडली. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पीडित तरुणाला दगड आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करणारे फरार झाले आहेत. पीडित तरुणावर उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी पीडित तरुणाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचाः लज्जास्पद! अल्पवयीन मुलाचा दुकानदाराकडून छळ, काही पैशांसाठी हिरावलं स्वातंत्र्य

महाराष्ट्रात लव्ह जिहाद प्रकरणांची संख्या मोठी- फडणवीस

- Advertisement -

राज्यात लव्ह जिहाद प्रकरणांच्या (Love Jihad Cases) संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचा दावा  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यातील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींच्या तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात लव्ह जिहादची प्रकरणं उघडकीस आली आहेत. यामध्ये राज्यात हरवलेल्या तक्रारींच्या शोधण्याचे प्रमाण ९० ते ९५ टक्के इतके आहे. काही प्रकरणांमध्ये खोटी आश्वासनं आणि ओळख दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे काही प्रकरणांमधून आढळून आले आहे. तसेच विवाहित पुरुषही महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते. लव्ह जिहादची प्रकरणंही मोठ्या प्रमाणात समोर आली आहेत, असं फडणवीस म्हणाले. लव्ह जिहादवर आम्ही कायदा आणण्याचा विचार करत आहोत. यासंदर्भात सध्या अस्तित्वात असलेल्या विविध कायद्यांचा अभ्यास आम्ही करत आहोत. लव्ह जिहाद हा एक असा शब्द आहे की, तो (दक्षिणपंथी) कार्यकर्त्यांकडून वापरला जातो. मुस्लिम पुरुष लग्नाच्या बहाण्याने हिंदू स्त्रियांना इस्लाममध्ये धर्मांतरित करत असल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जातो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबईतही लव्ह जिहाद

मुंबईमध्ये राहणाऱ्या एका म़ॉडेलने तनवीर अख्तर नावाच्या एका मुस्लिम तरुणाने लव्ह जिहादचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. मागच्या काही महिन्यांपासून तनवीर आपल्याला ब्लॅकमेल करतोय धर्मांतर करुन लग्न करण्यासाठी दबाव टाकतोय, असा आरोप या मॉडेलकडून करण्यात आला आहे. ही मॉडेल मुळची बिहारला राहणारी आहे. 2020 पासून ही मॉडेल त्या व्यक्तीला ओळखते. तेव्हा या व्यक्तीने आपलं नाव यश असं सांगितलं. दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर त्याने तिच्यासोबत काही आक्षेपार्ह फोटो काढले आणि त्यानंतर आता तो तिला ब्लॅकमेल करत आहे. तसचं हा तरुण काही दिवसांपूर्वी तिच्यामागे रांचीला गेला आणि गळा दाबून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही या मॉडेलकडून करण्यात आला आहे. तसचं, धर्मपरिवर्तन करुन लग्न कर असा दबाव याआधीही त्याने अनेक मुलींवर टाकल्याचं या मॉडेलने म्हटलं आहे.

- Advertisment -