घरमहाराष्ट्रराज्यात थंडीने गाठला एकेरी आकडा; सर्वात कमी तापमान 'या' ठिकाणी

राज्यात थंडीने गाठला एकेरी आकडा; सर्वात कमी तापमान ‘या’ ठिकाणी

Subscribe

राज्यात येत्या दोन-तीन दिवसात काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता

राज्यात येत्या दोन दिवसांत थंडीची लाट येईल, असा इशाला हवामान खात्याने दिला आहे. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यात गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण असल्याने हवामान फारसे थंड जाणवले नाही. मात्र आता उत्तर भारतातून थंडीचा तडाखा राज्याच्या दिशेकडे सरकण्यास सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात हवामानात गारठा जाणवू लागला आहे. त्यामुळे थंडीच्या तापमानाने एकेरी आकडा गाठल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

राज्यात अनेक भागात थंडीची लाट पसरली असून उत्तर भारतातून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात थंड वातावरण आहे. हा थंड वाऱ्यांचा प्रभाव सध्या वाढत असल्याने राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा घसरल्याचे निरीक्षण हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

राज्यात सर्वात कमी किमान तापमान निफाड ६.५ अंश सेल्सिअस तर त्यानंतर परभणी येथे ७.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. राज्यात येत्या दोन-तीन दिवसात काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात हवामान कोरडे असल्याने राज्याला अधिक हुडहुडी भरणार आहे. यामुळे राज्यातील विविध ठिकाणचा किमान पारा तापमानाचा चांगलाच घसरल्याचे दिसतेय. सध्या औरंगाबादमध्ये किमान तापमान ९.२ अंश सेल्सिअस आहे. तर सातरा ९, जळगाव ९, परभणी ७.६, बारामती ९ , पुणे ८.१, निफाड ६.५, नाशिक ८.४, नांदेड ९.९, जेऊर ८ अंश तापमान नोंदवण्यात आले. त्यामुळे आता राज्यात पुन्हा थंडीने चादर पसरली आहे.

- Advertisement -

कोल्हापूर जिल्ह्यात थंडी वाढली असून १४.५ पारा अंशापर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे येथे थंडी वाढण्याची शक्यता आहे. तर प्रादेशिक हवामान खाते मुंबईने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील पारा घसरला असून कुलाब्यात किमान २० अंश सेल्सिअस तर सांताक्रुझमध्ये १६ अंश सेल्सिअस तापामानाची नोंद करण्यात आली आहे. यासह माथेरानमध्ये १६.२ किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.


नाईट कर्फ्यूमुळे हॉटेल व्यावसायिक नाराज; शरद पवारांची भेट घेणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -