घरमहाराष्ट्रLPG Cylinder होणार स्वस्त? बजेटनंतर दर होणार अपडेट

LPG Cylinder होणार स्वस्त? बजेटनंतर दर होणार अपडेट

Subscribe

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प संसदेसमोर मांडणार आहेत. बजेटच्या दिवशी LPG सिलिंडरचे दर अपडेट होण्याची शक्यता आहे. दिल्लीत सध्या घरगुती सिलिंडचे दर 903 रूपये आहे. तर मुंबईत 902.50 रूपये, कोलकात्यात 929 रूपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपये आहे. 30 ऑगस्ट 2023 मध्ये घरगुती सिलिंडरच्या दरात बदल झाले होते. 1 मार्च 2023 रोजी LPG सिलिंडरचा दर दिल्लीत 1103 रूपये होता. एकाचवेळी 200 रूपयांनी स्वस्त करण्यात आला. फेब्रुवारीचा ट्रेंड पाहता 2021 मध्ये तीन वेळा सिलिंडरचा दर बदलला होता आणि 100 रूपयांनी वाढला होता.

फेब्रुवारी 2023 मध्ये घरगुती सिलिंडच्या किंमतीत कोणत्याही प्रकारचा बदल झाला नव्हता. त्यानंतर 1 मार्च 2023 राजी सिलिंडरच्या किंमतीत बदल झाला. फेब्रुवारी 2021 संदर्भात बोलायचे झाले तर, बजेटच्या दिवशीच 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल झाला नाही. मात्र 4 फेब्रुवारीला सिलिंटडरच्या किंमतीत 25 रूपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 15 फेब्रुवारीला सिलिंडरच्या दरात 50 रूपयांनी वाढ करण्यात आली. एक जानेवारी 2021 रोजी सिलिंडरचा दर 694 रूपयांवर होता. तो वाढून 769 रूपयांवरपर्यंत पोहोचला. त्यानंतर 10 दिवसांनंतर हा दर 25 रुपयांनी पुन्हा वाढला आणि सिलिंडरचा दर 794 रूपयांवर पोहचला.

- Advertisement -

हेही वाचा… BJP: भाजपा असेतो वेगळा विदर्भ शक्य नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा

कॉमर्शिअल सिलिंडरच्या किंमतीत 3 वर्षात 49 वेळा बदल झाला. गेल्या महिन्यात किरकोळ बदलासह कॉमर्शिअल सिलिंडर दिल्लीमध्ये 1755.50 रूपये, मुंबईत 1708.50, कोलकात्यात 1869 तर चेन्नईमध्ये 1924.50 रूपयांवर पोहोचला.

- Advertisement -

आयओसीच्या (IOC) आकडेवारीनुसार, 1 जानेवारी 2021 रोजी LPG च्या 19 किलोच्या सिलिंडरचा दर दिल्लीत 1349 रूपये होता. तेव्हाच्या आणि आताच्या किंमतीत 406.50 रूपयांचा फरक आहे. यावेळी 1फेब्रुवारीला काही बदल झाल्यास तो कमर्शिअल सिलिंडरमध्ये होऊ शकतो. निवडणुकीचे वर्ष पाहता घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर कमीही होऊ शकतात, असे झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -