घरमहाराष्ट्रघरगुती सिलिंडर 50 रुपयांनी महाग; सर्वसामान्यांना महागाईचा चटका

घरगुती सिलिंडर 50 रुपयांनी महाग; सर्वसामान्यांना महागाईचा चटका

Subscribe

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना महागाईचा चटका दिला आहे. देशभरात स्वयंपाकाच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ झाली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर नोव्हेंबर 2021 पासून वाढलेले नव्हते. पुढील काही दिवसांत देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात अनुक्रमे 15 ते 22 रुपयांची वाढ होऊ शकते.

महाराष्ट्राला मोठी झळ
इंधनाच्या दरात वाढ झाल्याची सर्वाधिक झळ ही महाराष्ट्रालाच बसताना दिसत आहे. देशातील सर्व महानगरांच्या तुलनेत मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वाधिक आहेत. मुंबईत पेट्रोल 110.82 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95.00 रुपये प्रति लिटरवर गेले आहे. त्याच तुलनेत दिल्लीत पेट्रोल 96.21 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 87.47 रुपये प्रति लिटर आहे. म्हणजेच देशाची राजधानी दिल्लीपेक्षा मुंबईत पेट्रोलचे दर एका लिटरमागे 14 रुपयांनी महाग आहेत. त्याचप्रमाणे डिझेलही 9 रुपयांनी महाग आहे. त्यामुळे राज्यातील वाहतूकदारांना इंधनासाठी जास्त खर्च करावे लागणार असून यामुळे जीवनावश्यक वस्तूदेखील महागण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

विनाअनुदानित सिलिंडर 949.50 रुपयांवर
वाढलेल्या नव्या दरांमुळे 14.2 किलोचा विनाअनुदानित सिलिंडर आता 949.50 रुपयांना मिळणार आहे. 5 किलोचा एलपीजी सिलिंडर 349 रुपयांना, 10 किलोचा 669 रुपयांना आणि 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 2003.50 रुपयांना मिळणार आहेो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -