घरताज्या घडामोडीLPG Price hike : घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागला; सर्वसमान्यांच्या आर्थिक...

LPG Price hike : घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागला; सर्वसमान्यांच्या आर्थिक खर्चात वाढ

Subscribe

एकिकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत, तर दुसरीकडे आता घरगुती गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 50 रुपयांनी वाढ झाली आहे आता मुंबईत 14.2 किलोंचा सिलिंडर 1000 रुपयांना मिळणार आहे.

एकिकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत, तर दुसरीकडे आता घरगुती गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 50 रुपयांनी वाढ झाली आहे आता मुंबईत 14.2 किलोंचा सिलिंडर 1000 रुपयांना मिळणार आहे. सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे महागाईचा भडका उडाला आहे. याआधी घरगुती सिलिंडरसाठी 949 रुपये 50 पैसे मोजावे लागत होते. आता त्यात पुन्हा दरवाढ झाल्यामुळे सिलिंडर 1000 रुपयांना विकत घेण्याची वेळ सामान्यांवर आली आहे.

गेल्या 10 महिन्यात एलपीजी सिलेंडर 165 रुपये 50 पैसे महागला आहे. जुलै 2021 पासून तब्बल 5 वेळा गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. आता मुंबईत सिलिंडर 999.50 रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीतही 999.50 रुपयांना गॅस मिळणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये घरगुती आणि व्यावसायिक कारणांसाठी या गॅसच्या वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचबरोबर किंमतीतही वाढ झाली आहे.

- Advertisement -

एलपीजीची किंमत, मुख्यत्वे क्रूडच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर अवलंबून असते. कच्चा तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने आता गॅसही महागला आहे. मुंबईतील एलपीजी सिलिंडरचे दरही वाढले आहेत. गरीब घटकांसाठी सरकारने या किमतींवर अनुदान दिले आहे.

मुंबईत आज विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 949.50 होती. आता हा एलपीजी 999.50 रुपयांना मिळणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. 1 मे रोजी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 102.50 रुपयांनी वाढून 2355.50 रुपयांवर पोहोचली, जी पूर्वी 2253 रुपये होती. तसेच, 5 किलोच्या एलपीजी व्यावसायिक सिलिंडरची किंमत 655 रुपये करण्यात आली आहे.

- Advertisement -

19-किलोच्या व्यावसायिक एलपीजीचा दर 1 एप्रिलला 250 रुपये प्रति सिलिंडरने वाढवून 2,253 रुपये झाला होता. शिवाय, 1 मार्च 2022 रोजी व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत 105 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.


हेही वाचा – नागपुरच्या उमरेड मार्गावर भीषण अपघात; कार ट्रकच्या धडकेत सात जणांचा मृत्यू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -