घरमहाराष्ट्रआय लव्ह उद्धव, लकी अली यांची पोस्ट व्हायरल

आय लव्ह उद्धव, लकी अली यांची पोस्ट व्हायरल

Subscribe

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगेळे वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सर्वसामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटींपर्यंत काहींना यावर प्रतिक्रिया दिली. यासगळ्यात गायक लकी अलीने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

लकी अली यांनी फेसबूकवर ही पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आय लव्ह उद्धव, मी त्यांच्या राज्यकारभाराचा आदर करत आहे. विषय संपल, असे या पोस्टमध्ये फुल स्टॉप असे म्हणते त्यांनी यावर मला आणखी काही बोलायचे नाही, असे दाखवले आहे.

- Advertisement -

मुंबई योग्य व्यक्तीच्या हातात –

- Advertisement -

गेल्या वर्षी लकी अली यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मुंबई योग्य व्यक्तीच्या हातात असल्याचे त्यावेळी त्यांनी म्हटले होते. त्यावेळीही त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले होते. आदित्य ठाकरे मला गाडीपर्यंत सोडायला आले, त्यांनी गाडीचा दरवाजा उघडून दिला म्हणजे ज्येष्ठांबद्दल त्यांचा आदर दिसून येतो, असेही अली म्हणाले होते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -