घरउत्तर महाराष्ट्रबनावट नाव सांगत ओढले प्रेमाच्या जाळ्यात; तीन वर्षे सातत्याने अत्याचार

बनावट नाव सांगत ओढले प्रेमाच्या जाळ्यात; तीन वर्षे सातत्याने अत्याचार

Subscribe

नाशिक : बनावट नाव सांगून २३ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीला एका तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढत लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर २०२० ते २०२३ या तीन वर्षांमध्ये दोघांच्या राहत्या घरी, वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनेक वेळा त्याने तिला मद्यधुंद अवस्थेत मारहाण केल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे, तिसर्‍यांदा गर्भवती राहिल्यानंतर त्याने तिला लग्नास नकार दिल्याने आणि मारहाण केल्याने फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. याप्रकरणी पीडित तरुणीने नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी संशयित सद्दाम जाफर शेख, शाहजाद शेख, जाफर शेख, रहेमान शेख (सर्व जण रा. देवळाली गाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Love jihad case in Nashik road)

तरुणीच्या फिर्यादीनुसार व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी उच्चशिक्षित असून, ती नाशिकमधील एका नामांकित महाविद्यालयात इंजिनीअरींगचे शिक्षण घेते. सप्टेंबर २०२० मध्ये पीडित तरुणी मैत्रीण, मानलेले दोन भाऊ व त्यांच्या एका मित्रासमवेत अजमेरला गेली होती. अजमेरमध्ये तिची संशयित आकाश जाधवशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये झाले. नाशिकला परत आल्यावर तिला आकाश जाधवचे खरे सद्दाम जाफर शेख असल्याचे समजले. याप्रकरणी तिने त्याला जाब विचारला असता त्याने चेष्टामस्करी केल्याचे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी सद्दामने तिला लग्नाची मागणी घातली. मात्र, तिने लग्नास नकार देत फक्त मैत्रीस होकार दिला. ऑक्टोबर २०२० मध्ये पुन्हा सद्दामने लग्नाची मागणी घालत तिला स्वत:च्या घरी नेत आई वडिलांशी ओळख करून दिली. त्याच्यावर विश्वास बसल्याने तिने त्याला लग्नास होकार दिला. तितक्यात तिला अस्वस्थ वाटू लागल्याने ती सद्दामच्या घरी थांबली. ती संधी साधत सद्दामने तिच्यावर बलात्कार केला. शिवाय, त्याने ही बाब कोणाला सांगून नको, तुझीच बदनामी करेल, असे त्याने सांगितल्याने ती भयभीत झाली.

- Advertisement -

नोव्हेंबर २०२० मध्ये गरोदर असल्याचे तिला समजले. ही बाब सद्दामला समजताच त्याने गर्भपात करण्यास सांगितले. त्यावेळी त्याने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. डिसेंबर २०२० मध्ये पीडित तरुणीचा वाढदिवस असल्याची संधी साधत त्याने तिला गंगापूर रोडवरील एका हॉटेलमध्ये आणले. या ठिकाणी आमिष दाखवत पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. व्हॅलेण्टाईन डेच्या दिवशी तिला त्र्यंबकेश्वरमधील एका लॉजवर आणत तिच्यावर बलात्कार केला. ती पुन्हा गर्भवती राहिल्याने त्याने पुन्हा ६ मार्च २०२२ मध्ये गर्भपात केला. जून २०२३ मध्ये सद्दाम अचानक तिच्या घरी आला. त्याने पत्नीला सोडून दिले असल्याचे सांगत तिच्यावर बलात्कार केला. त्यातून ती तिसर्‍यांदा गर्भवती राहिली. ही बाब तिने त्याला सांगितली असता त्याने हे बाळ माझे नाही, तू काय करायचे ते ठरव, असे म्हणत लग्नास नकार दिला.

प्रियकराच्या घरात तिला दिसली दुसरी तरुणी

काही दिवसांनी तरुणी सद्दामच्या घरी गेली असता तिला त्याच्या घरात अनोळखी महिला दिसल्याने धक्का बसला. तिने विचारणा केली असता सद्दामने तिला पत्नी आदीबा शेख असून, वडिलांनी जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचे सांगितले. त्यावेळी सद्दामच्या आईवडिलांनी तिला घराबाहेर काढले.

- Advertisement -

तिचे लग्न ठरविले तर मोडेन

पीडित तरुणीच्या आईने तिचे लग्न ठरवले. ही बाब सद्दामला समजली. त्याने तरुणीच्या घरी येत राडा केला. तिचे लग्न ठरविले तर ते मी मोडेन, असे त्याने तरुणीच्या आईला सांगितले. त्यावेळी सद्दाम आणि तिच्या आईमध्ये वाद झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -