घरताज्या घडामोडीठाकरे सरकारकडून महाराष्ट्रातील जनतेची लूट, पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटवरून माधव भंडारींची टीका

ठाकरे सरकारकडून महाराष्ट्रातील जनतेची लूट, पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटवरून माधव भंडारींची टीका

Subscribe

केवळ अहंकारापोटी ठाकरे सरकार पेट्रोल – डिझेल वरील व्हॅट मध्ये कपात करण्यास नकार देऊन महाराष्ट्रातील सामान्य जनतेची लूट करीत आहे , अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी गुरुवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी करण्याच्या केलेल्या आवाहनाला उत्तर देताना जीएसटीचा मुद्दा पुढे करून मुख्यमंत्र्यांनी आपल्या अज्ञानाचे पुन्हा दर्शन घडविले आहे, असेही भंडारी म्हणाले.

इंधनाच्या दरावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये भडका उडाला आहे. या पार्श्वभूमीवर भंडारी यांनी आज पत्रकार परिषदेत आघाडी सरकारवर हल्ला चढवला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात पेट्रोलवर ३२ रु. १५ पैसे इतका व्हॅट आकारला जातो. केंद्र सरकारने पेट्रोल – डिझेल वरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर भाजपशासित राज्यांनी पेट्रोल – डिझेल वरील व्हॅट तातडीने कमी केला. मात्र महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, केरळ, झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांनी पेट्रोल – डिझेल वरील व्हॅट कमी केला नाही.

- Advertisement -

राज्यांनीही आपल्या अखत्यारीतील करांचे ओझे कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा होती. पण दारूवरील कर कमी करणाऱ्या ठाकरे सरकारने पंतप्रधानांचे आवाहन झुगारून राजकारण सुरूच ठेवले आणि त्याचा थेट फटका नागरिकांना बसला. गेल्या सहा महिन्यांत या करांपोटी राज्य सरकारने तब्बल साडेतीन हजार कोटींचा महसूल कमावला आहे.

सामान्य नागरिकांच्या खिशात हात घालून केलेल्या या कमाईबद्दल जनतेची माफी मागण्याऐवजी, केंद्र सरकारवर दुगाण्या झाडून जनतेची दिशाभूल करणारे ठाकरे सरकार जीएसटीचा पूर्ण परतावा मिळाल्यानंतर पेट्रोल-डिझेलवरील राज्याकडून आकारला जाणारा भरमसाठ दर कमी करणार आहे का? असा सवाल भंडारी यांनी केला.

- Advertisement -

महाराष्ट्राने राज्यांतर्गत कर कमी केल्यास पेट्रोल डिझेलचे भाव किमान १० टक्क्यांनी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो. पण ठाकरे सरकारची ती इच्छा नाही. केंद्र सरकारशी संघर्ष करण्याच्या ठाकरे सरकारच्या खुमखुमीमुळे नागरिकांना वेठीस धरले जात आहे, असेही भंडारी म्हणाले.


हेही वाचा : Maharashtra Corona Update : राज्यात २४ तासांत १६५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर दोन रुग्णांचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -