छत्रपती संभाजीनगर – विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले आहेत. मराठवाड्यातील 48 जागांवर काय होणार याची चिंता राजकीय नेत्यांना लागली आहे. तर मनोज जरांगे फॅक्टर विधानसभा निवडणुकीत काम करणार का, याचीही उत्सूकता महाराष्ट्राला लागून राहिली आहे. दरम्यान अकोला येथील स्वंयघोषित महाराज कालीचरण यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगेंवर तोंडसुख घेतले आहे. ‘द्वेष मला हिंदू धर्मद्रोह्यांचा आहे, ज्यांच्यामुळे हिंदू धर्मामध्ये फूट पडत आहे. त्यांचा मी द्वेष करतो. जरांगे यांच्यामुळे हिंदू धर्मात फूट पडत आहे,’ असं कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे.
कालीचरण महाराजांची जरांगेवर टीका
कालीचरण महाराज दोन दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना लक्ष्य करत आहे. त्यांनी म्हटले की, ‘द्वेष मला हिंदू धर्मद्रोह्यांचा आहे. ज्यांच्यामुळे हिंदू धर्मात फूट पडत आहे, त्यांचा मला द्वेष आहे. जरांगे यांच्यामुळे हिंदू धर्मामध्ये फूट पडत आहे. मौलाना मोमीन यांच्यासोबत बसणे, चादर चढवायला जाणे, मौलाना असेल इम्तियाज जलील असतील, मुसलमानाच्या मांडीला मांडी लावून बसले, त्यांनी मराठा समाजाला कुठलं आरक्षण मिळवून दिलं?’ असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
संभाजीनगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात कालीचरण यांनी मनोज जरांगे यांना राक्षस म्हटले होते. जरांगे यांचा उल्लेख टाळून ते म्हणाले की, “हिंदू धर्मामध्ये फूट पाडणारा राक्षण आहे.” कालीचरण यांच्या या वक्तव्याने शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या आडचणी वाढल्या. कालीचरण यांनी औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील एका कार्यक्रमात जरांगे यांच्यावर निशाणा साधला. त्याचे पडसाद अजुनही उमटत आहेत. कालीचरण यांच्या त्या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवारही जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेलेले दिसले. आमदार संजय शिरसाट यांनी जरांगेंची भेट घेतली. तर जरांगे यांनी कालीचरण यांनी टिकली वाकडी-तिकडी लावली म्हणून ते काही देव होत नाही, असे म्हटले होते.
हेही वाचा : Cash for Vote : तावडे प्रकरणावरुन राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला; कोणी टेम्पोने पाच कोटी पाठवले?
Edited by – Unmesh Khandale