Homeमहाराष्ट्रMaha Kumbh 2025 : पंचतारांकित तंबूत फक्त श्रीमंतांचीच विचारपूस, ठाकरेंचा भाजपावर निशाणा

Maha Kumbh 2025 : पंचतारांकित तंबूत फक्त श्रीमंतांचीच विचारपूस, ठाकरेंचा भाजपावर निशाणा

Subscribe

कुंभ सोहळ्यात ‘व्हीव्हीआयपी’ संस्कृतीचा बोलबाला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा यांसारखे अतिसुरक्षा व्यवस्था असलेले लोक संगमावर डुबकी मारण्यासाठी पोहोचतात तेव्हा दिवसभर आठ-दहा किलोमीटरचा परिसर श्रद्धाळूंसाठी बंद केला जातो. त्यामुळे गर्दी वाढतच जाते.

(Maha Kumbh 2025) मुंबई : कुंभ सोहळ्याचे राजकारण सुरू आहे आणि त्यासाठी भाजपाची यंत्रणा काम करीत आहे. देशात याआधीही भव्य प्रमाणात कुंभ सोहळे पार पडले आहेत, पण भाजपास असे वाटते की, ‘कुंभ’ उत्सव हा त्यांच्यामुळेच 2014 नंतर घडू लागला आहे. प्रयागराज, हरिद्वार, नाशिक, उज्जैन येथे याआधी पार पडलेले कुंभ सोहळे थाटात झाले आणि राजकारणविरहीत पार पडले, अशा शब्दांत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. (Thackeray targets BJP over VIP culture)

प्रयागराजच्या 1954च्या कुंभ सोहळ्याचे निरीक्षण आणि नियंत्रण स्वतः पंतप्रधान पंडित नेहरूच करीत होते. मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत प्रयागतीर्थी ठाण मांडून होते तसेच श्रद्धाळूंची जातीने विचारपूस करीत होते. आजच्या कुंभमेळ्यात सामान्य श्रद्धाळू रस्त्यावर तर, पंचतारांकित तंबूत आणि संगमावर फक्त श्रीमंतांचीच विचारपूस सुरू आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखातून केली आहे.

हेही वाचा – Namdev Shastri : मस्साजोगमधील आरोपींची मानसिकाताही समजून घेतली पाहिजे – नामदेव शास्त्री

प्रयागराज येथे उपस्थित असलेल्या अनेक धर्माचार्यांनी तसेच महामंडलेश्वरांनी कुंभाच्या व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली आणि ही सर्व व्यवस्था लष्कराकडे सोपवा अशी मागणी केली. या कुंभापेक्षा समाज पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या काळात झालेल्या कुंभाचे व्यवस्थापन चांगले होते, असे उघडपणे बोलले जात असेल तर, भाजपा पुढाऱ्यांनी त्यावर चिंतन केले पाहिजे, असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे.

कुंभ सोहळ्यात ‘व्हीव्हीआयपी’ संस्कृतीचा बोलबाला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा यांसारखे अतिसुरक्षा व्यवस्था असलेले लोक संगमावर डुबकी मारण्यासाठी पोहोचतात तेव्हा दिवसभर आठ-दहा किलोमीटरचा परिसर श्रद्धाळूंसाठी बंद केला जातो. त्यामुळे गर्दी वाढतच जाते. कुंभ सोहळ्यात महत्त्वाच्या राजकीय व्यक्ती, गौतम अदानी यांच्यासारखे श्रीमंत शेठ यांच्या कुंभस्नानासाठी प्रशासन चार-चार दिवस राबत असते. त्यांच्यासाठी सर्व काही राखीव. कोणताही ओरखडा न उठता त्यांचे गंगास्नान होते आणि मोक्षाचे दरवाजेही उघडतात, पण स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी धडपडणाऱ्या श्रद्धाळूंना गर्दीत चेंगरून मरावे लागते, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले आहे.

इतक्या मोठ्या आयोजनात अशा छोट्या-मोठ्या दुर्घटना घडतच असतात, असे योगी सरकारातले ‘भाजपा’ मंत्री संजय निषाद सांगतात. शंभर लोक तुडवून मारले ही ज्यांना सामान्य घटना वाटते असे लोक हिंदुत्वाची ध्वजा हाती घेऊन उभे आहेत, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली आहे. (Maha Kumbh 2025 : Thackeray targets BJP over VIP culture)

हेही वाचा – Eknath Shinde : रायगडचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे, मुंबई भाजपच्या खात्यात जाण्याची शक्यता