Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaha Politics : दिल्लीत मानपमानाचे नाट्य, शहांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिली भेटीची वेळ,...

Maha Politics : दिल्लीत मानपमानाचे नाट्य, शहांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिली भेटीची वेळ, मात्र शिंदेंचे खासदार वेटिंगवर

Subscribe

शिंदे गटाचे खासदार भाजपाचे राष्ट्रीय नेते, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी वेळ मागत असतानाही ती वेळ त्यांना कोणत्या ना कोणत्या नाकारण्यात आली आहे. पण दुसरीकडे मात्र, अमित शहांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांना भेटीची वेळ दिली.

नवी दिल्ली : राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाविजय मिळविण्यात यश आले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात महायुतीच सत्ता स्थापन करणार आहे. पण महायुतीमधून मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हे मात्र निश्चित झालेले नाही. ज्यामुळे आता महायुतीतील राजकीय नाट्याला सुरुवात झाली आहे. कारण एकीकडे शिंदे गटाचे खासदार भाजपाचे राष्ट्रीय नेते, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी वेळ मागत असतानाही ती वेळ त्यांना कोणत्या ना कोणत्या नाकारण्यात आली आहे. पण दुसरीकडे मात्र, अमित शहांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांना भेटीची वेळ दिली. तटकरे यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून यामुळे शिंदेंच्या गोटात मात्र नाराजी पसरली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Maha Politics : Amit Shah gave appointment to NCP leaders, but Shinde group MP on waiting)

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही अद्यापही महायुतीतील मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा करण्यात यावी, अशी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची भूमिका असताना त्यांनी शहांकडे भेटीची वेळ मागितली होती. मात्र, शहांकडून ती देण्यात आली नाही. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटीची वेळ देत अमित शहांनी त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली. ज्यामुळे आता शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला असून मुख्यमंत्रिपदाचा निर्णय पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहांवर सोपवला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Eknath Shinde : माझी अडचण होणार नाही, भाजपच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा; शिंदेंनी CM पदाचा दावा सोडला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्याने भाजपाला आपला आमदार मुख्यमंत्रिपदावार बसविण्याचा मार्ग मोकळा झाला. पण आता महायुतीतील तिन्ही प्रमुख नेते असलेले एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुरुवारी (ता. 28 नोव्हेंबर) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापासून ते मंत्र्यांबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -