Sangli District Bank Elections: सांगलीत भाजपला जबर धक्का, महाविकास आघाडीची एकहाती सत्ता

Maha Vikas aghadi beat bjp in Sangli District Bank Election but vikram sawant lost
Sangli District Bank Elections: सांगलीत भाजपला जबर धक्का, महाविकास आघाडीची एकहाती सत्ता

जळगावनंतर आता सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने भाजपला चांगलाच दणका दिला आहे. महाविकास आघाडीने सांगली जिल्हा बँकेवर एकहाती सत्ता मिळवली आहे. भाजपला केवळ ४ जागा मिळाल्या आहेत. परंतु काँग्रेसचे आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांचा पराभव झाला आहे. विक्रम सावंत हे सध्याचे संचालक आहेत. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये २१ जागांपैकी १७ जागांवर विजय मिळवला आहे. तर तीन जागा या बिनविरोध झाल्या आहेत. भाजपला एकूण ४ जागा मिळाल्या आहेत.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीमध्ये एकूण ८५.३१ टक्के मतदान झाले. यामध्ये शिवसेनेला ३ जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस ९ जागा आणि काँग्रेसला ५ जागांवर विजय मिळाला आहे. भाजप ४ जागांवर विजयी झाली आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजप एका बाजूला फेकली गेली आहे. भाजपकडून सत्यजित देशमुख, संग्रामसिंह देशमुख आणि राहुल महाडिक यांनी विजय मिळवला आहे. सांगली जिल्हा बँकेसाठी रविवारी निवडणूक घेण्यात आली होती. ३ संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. तर १७ संचालक निवडून आले आहेत. महाविकास आघाडीने सहकार पॅनेलच्या माध्यमातून १७ जागांवर विजय मिळवला आहे.

साताऱ्यात शंभूराज देसाई, शशिकांत शिंदे पराभूत

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला आहे. पंचवार्षिक निवडणुकीमध्ये बड्या नेत्यांनाही झटका बसला आहे. पाटण सोसायटी मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई पराभूत झाले आहेत. शंभूराज देसाईंचा सत्यजितसिंह पाटणकर यांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये शंभूराज देसाई यांना ४४ मते मिळाली आहेत. तर पाटणकर यांना ५८ मते मिळाली आहेत. पाटणकर हे ७ मतांनी विजयी झाले आहेत. तसेच शशिकांत शिंदे यांना देखील ज्ञानदेव रांजणेंनी पराभूत केलं आहे.


हेही वाचा : मविआचं ‘पॉवर’ सेंटर ‘सिल्वर ओक’च असेल, सरकार २५ वर्ष टीकेल – संजय राऊत