नगरपंचायतीत महाविकास आघाडीचाच नगराध्यक्ष हवा, महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आवाहन

Inconsistency in the Mahavikas Aghadi Congress-NCP contacts with MLAs
मविआमध्ये अपक्ष आमदारांची पळवापळवी, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून आमदारांशी संपर्क

नरगपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला भरघोस यश मिळाले. या पार्श्वभूमीवर आता नगराध्यक्षांच्या होणार्‍या निवडणुकीतही महाविकास आघाडीचाच नगराध्यक्ष व्हायला हवा. यासाठी सर्व सदस्यांनी स्थानिक पातळीवर प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहन महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून करण्यात आले आहे. यासंदर्भातील पत्रच स्थानिक नेत्यांना तसेच नगर पंचायत सदस्यांना पाठविण्यात आले आहे.

महाविकास आघाडीला नगरपंचायत निवडणुकीमध्ये मिळालेले यश कायम ठेवायचे आहे. जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवायचा आहे. किमान समान कार्यक्रमाुसार स्थानिक पातळीवर विकास करायचा असेल तर नगर पंचायतीमध्ये आघाडीचा नगराध्यक्ष होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी स्थानिक पातळीवर प्रयत्न करावेत. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या निवडून आलेल्या सदस्यांना विश्वासात घेऊन जास्तीत जास्त नगराध्यक्ष महाविकास आघाडीचे येतील यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या पत्राद्वारे करण्यात आले आहे.