घरमहाराष्ट्रविधान परिषद निवडणुकीबाबत आघाडीचा नाशिकचा निर्णय गुलदस्त्यात

विधान परिषद निवडणुकीबाबत आघाडीचा नाशिकचा निर्णय गुलदस्त्यात

Subscribe

गुरुवारी अधिकृत निर्णयाची घोषणा

मुंबई : विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर आणि नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या संदर्भातील आघाडीचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात आहे. काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत निर्णयावर सहमती झाली. परंतु, आघाडीने निर्णय जाहीर न करता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून आज, गुरुवारी निर्णय घोषित करण्याचे ठरवले आहे.

विधान परिषद निवडणुकीवरून  महाविकास आघाडीत घोळ आहे. नाशिकमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज न दाखल करता पक्षाला दगा दिला. त्यामुळे काँग्रेसची नाचक्की झाली असून नाशिकमध्ये  कोणत्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा  द्यायचा यावर आघाडीत खल सुरू आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर आघाडीच्या नेत्यांची  बुधवारी येथील आयटीसी या पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र,  या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित नव्हते. या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेचसे प्रमुख नेते आज मुंबईत उपस्थित नव्हते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे. बैठकीत  अतिशय सकारात्मक अशी चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुरूवारी चर्चेला येतील. त्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल. दुपारपर्यंत महाविकास आघाडीचा अंतिम निर्णय घोषित करण्यात येईल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

- Advertisement -

तर विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये योग्य समन्वय आहे. तसेच काँग्रेस पक्षातही कोणताच गोंधळ नाही. नाशिक मतदारसंघात भाजपला उमेदवारही मिळाला नाही. भाजपने येथे अजून आपला पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्यामुळे आम्ही आमचा निर्णय उद्या (गुरुवार) जाहीर करू,  असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले यावेळी म्हणाले.
या बैठकीला शिवसेनेच्या वतीने खासदार अरविंद सावंत आणि विनायक राऊत उपस्थित होते.


मुंबई दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींच खास मराठीतून ट्वीट, म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -