जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचा २० जागांवर विजय, भाजपला मोठा धक्का

maha vikas aghadi panel win in jalgaon district bank election rohini khadse one side win
जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचा २० जागांवर विजय, भाजपला मोठा धक्का

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीच्या पॅनलने जिल्हा बँकेत एकूण २० जागांवर विजय मिळवला आहे. तसेच अपक्ष आमदार संजय सावकारे यांचा एका मतदारसंघात विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा एकतर्फी विजय झाला आहे. रोहिणी खडसे यांचा विजय हा त्यांनी मागील काही वर्षांपासून केलेल्या कामाचा मोबदलाच आहे.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळाले आहे. महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसनं ११ जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेस ७ आणि शिवसेनेचा २ जागांवर विजय झाला आहे. तसेच एकाच जागेवर भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना एकतर्फी विजय मिळाला आहे.

रोहिणी खडसे या मागील ६ वर्षांपासून मतदारसंघात सक्रीय आहेत. या काळात त्यांनी अनेक लोकहीताची कामे केली आहेत. ओबीसी महिला राखीव मतदारसंघातून रोहिणी खडसेंनी एकतर्फी विजय मिळवला आहे. त्यामुळे आपल्या कामाची ही पोचपावती असल्याचे वक्तव्य रोहिणी खडसे यांनी केलं आहे. शेतकऱ्यांच्या आणि जिल्हा बँकेच्या हितासाठी काम करत राहणार असे रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.

संजय सावकारे यांचा अपक्ष म्हणून विजय

जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर भाजपकडून बहिष्कार टाकण्यात आला. सर्व उमेदवारांनी माघार घेतली होती. भुसावळचे आमदार संजय सावकारे विजयी झाले आहेत. माजी आमदार अरुण पाटील यांचा रावेर सोसायटी मतदारसंघातून एका मतामुळे पराभव झाला आहे. जर जनाबाई महाजन यांनी माघार घेतली होती तरी त्या विजयी झाल्या आहेत. याच अनपेक्षित निकालामुळे एकच चर्चा रंगली आहे. जनाबाई या एकूण २६ मतांनी विजयी झाल्या आहेत.


हेही वाचा : भाजपच्या संजय केणेकरांचा अर्ज मागे, डॉ. प्रज्ञा सातव यांची होणार बिनविरोध निवड