Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी महाबळेश्वरमधील चतुरबेट गावचा पूल गेला वाहून, ग्रामस्थांच्या तक्रारींवर प्रशासनाचं दुर्लक्ष

महाबळेश्वरमधील चतुरबेट गावचा पूल गेला वाहून, ग्रामस्थांच्या तक्रारींवर प्रशासनाचं दुर्लक्ष

स्थानिक नागरिकांना अद्यापही शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही.

Related Story

- Advertisement -

महाबळेश्वरमधील चतुरबेट गावचा पूल धोकादायक परिस्थितीमध्ये आला होता. चतुरबेट ग्रामपंचायतीनं वारंवार स्थानिक प्रशासनाकडे पुलाची पुनर्बांधणीची मागणी केली जात होती. परंतू प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे यंदाच्या मुसळधार पावसामुळे हा पूल पुर्णपणे वाहून गेला आहे. चतुरबेट पासून पुढील १७ ते १८ गावांना जोडणारा मुख्यम पूल वाहून गेला असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रतापगडपासून ते चतुरबेट, तापोळापर्यंतच्या गावांत दरड कोसळ्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना समोरे जावे लागत आहे. नागरिकांपर्यंत अद्यापही शासकीय मदत पोहचली नाही.

महाबळेश्वर तालुक्यातील चतुरबेट येथील जुना दगडी पुल हा अत्यंत धोकादायक स्थितीत आला होता. हा पूल कधीही कोसळण्याच्या स्थितीत होता तरीही नागरिक यावरुन आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत होते. स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार या पूल पाडून नव्याने बांधण्याची मागणी करण्यात येत होती. मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे या पुलाला तडे गेले होते. परंतू प्रशासनाने ऑडिट करुन केवळ डागडुजी करण्याचा निर्णय घेतला होता. अद्यापही या पुलाची डागडुजी करण्यात आली नसल्यामुळे अखेर यंदाच्या मुसळधार पावसामुळे पूल वाहून गेला आहे. यामुळे प्रशासानच्या हलगर्जीपणामुळे या दुर्घटनेला सामोरे जावे लागत असल्याचा संताप ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

महाबळेश्वरला जोडणारा चतुरबेट गावचा मुख्य पूल वाहून गेल्यामुळे स्थानिक नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एसटी वाहतूकही बंद करण्यात आली आहे. अनेक गावांजवळील रस्त्यालगत असलेल्या दरडी कोसळल्यामुळे नागरिकांना मदत पोहचणे कठीण होऊन बसले आहे. स्थानिक नागरिकांना अद्यापही शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. अशा बिक परिस्थितीत गावांतील गर्भवती, पौढ व्यक्तींना वैद्यकीय सुविधांना मुकावे लागणार आहे.

शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

महाबळेश्वर पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, ओढ्यांना पूर आला आहे. नदीपात्रामधील पाणी शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये घुसले. तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीची कामे पुर्ण केली होती मात्र आता शेतात मोठ्या प्रमाणात मातीचा गाळ येऊन बसला असल्यामुळे भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. चतुरबेट, दाभे, खरोशी, या गावामधील घरांच्या जवळ असणाऱ्या दरडी कोसळण्याच्या परिस्थितीत असल्यामुळे नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण पसरलं आहे.

पाण्याच्या विहिरीही राहिल्या नाही

- Advertisement -

मुसळधार पावसामुळे ओढे, नाले, दुथडी भरुन वाहू लागले आहेत. पाण्याची पातळी वाढल्यामुळे गावांतील विहिरीत मातीचा गाळ गेला आहे. विहिरीतील पाणी दुषित झाले असून पिण्यायोग्य राहिले नाही. चतुरबेट गावामधील जवळपास ६० ते ७० घरे धोक्यात आली आहेत.


हेही वाचा : कोयना नदीचं रौद्ररुप, चतुरबेट गावचा पूल पाण्याखाली, १२ गावांचा संपर्क तुटला

हेही वाचा : Satara Landslide: सातारा आंबेघर गावात ४ घरांवर दरड, १२ जणांचा मृत्यू


 

- Advertisement -