Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Maharashtra Lockdown 2021 : महाबळेश्वरात अनिल अंबानींच्या इव्हिनिंग वॉकवर CEO च्या दणक्यानंतर...

Maharashtra Lockdown 2021 : महाबळेश्वरात अनिल अंबानींच्या इव्हिनिंग वॉकवर CEO च्या दणक्यानंतर बंदी

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने लॉकडाऊन लागू केला आहे. याचदरम्यान प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी पत्नी टिना अंबानी आणि त्याचे बंधू मुकेश अंबानींसह महाबळेश्वर येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सध्या महाबळेश्वरातील त्यांच्या लाल बंगल्यावर वास्तव्यास आहेत. मात्र लॉकडाऊन असतानाही रविवारी सायंकाळी अंबानी कुटुंबीय आपल्या दोन्ही मुलांसह महाबळेश्वरमधील गोल्फ मैदानात वॉकसाठी आले होते. अनेक गावकऱ्यांनी आतापर्यंत त्यांना पाहिलं आहे. यामुळे महाबळेश्वरच्या मुख्याधिकाऱ्यांनी गोल्फ मैदानाची मालकी असणाऱ्य़ा संस्थेला नोटीस बजावली आहे. दरम्यान कारवाईच्या भीतीमुळे दि गोल्फ क्लबने आपल्या गोल्फ मैदानाला टाळे ठाकले आहे. तसंच या ठिकाणी येण्यास सर्वांना आता मज्जाव करण्यात येत आहे.

राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणारे महाबळेश्वरला सर्वसामान्य़ व्य़क्तींपासून ते नामंकित व्यक्ती खास उन्हाळ्याचा दिवसात भेट देत असतात. यात उद्योग विश्वात बोलबाला असणारे अंबानी बंधुही कुटुंबियांसह महाबळेश्वरला भेट देत असतात. यातून अंबानी कुटुंबिय़ांचे महाबळेश्वरवरील प्रेम दिसून येते. इतकेच नाही तर मुकेश अंबानी यांनी आपल्या मुलीचा साखरपुडाचा कार्यक्रमही महाबळेश्वरलाच आयोजित केला होता. मात्र आता राज्यात कोरोनाचा पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याचदरम्यान अंबानी कुटुंबिय महाबळेश्वरला पोहचले आहेत. गेली अनेक दिवस अनिल अंबानी पत्नी आणि मुलांसह सकाळ, संध्य़ाकाळ येथील गोल्फ मैदानात आवर्जून वॉकसाठी बाहेर पडत आहेत.

- Advertisement -

महाबळेश्वरमधील काही गावातील मंडळींना अनिल अंबानी कुंटुंबियांसह गोल्फ मैदानात चालायला येत असल्याची बातमी समजली. ही बातमी काही वेळातच पसरल्याने अनेक गावकरी त्यांना पाहण्यासाठी सायंकाळी मैदानात गर्दी करु लागले. यासंदर्भात माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांचापर्यंत पोहचली. त्यांनी संपूर्ण माहितीची खात्री करत गोल्फ मैदानाची मालकी असलेल्या द क्लब या संस्थेच्या सचिवांना नोटीस बजावली. सध्या लॉकडाउन नियामांतर्गत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. असे असताना तुमच्या मालकीच्या गोल्फ मैदानावर अनेक नागरिक सायंकाळचा वेळेस चालण्यासाठी गर्दी करत असल्याचे निदर्शनास आलं आहे. नोटीस मिळताच या गोल्फ मैदानाला टाळे ठोकण्यात आले. तसेच ठिकाणी इव्हिनिंग वॉकसाठी नागरिकांना प्रवेश दिला जाऊ नये. अन्यथा या जागेची मालकी असणाऱ्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत तसेच भारतीय साथ रोग अधिनियम १८९७ अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आला आहे.


 

- Advertisement -