घरमहाराष्ट्रमहाडची संभाव्य दरडग्रस्त गावांची यादी वाढली

महाडची संभाव्य दरडग्रस्त गावांची यादी वाढली

Subscribe

तपासणीतून गावांची संख्या ४९ वरून ६८ पर्यंत

संभाव्य दरडींचा धोका लक्षात घेवून महाड महसूल प्रशासनाने तालुक्यातील ४८ गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याच्या सूचना पावसाळ्यापूर्वी दिल्या होत्या. भूवैज्ञानिक विभागाकडून दरडींचा धोका असलेल्या गावांची यादी सादर केली जाते. मात्र, यावेळी तळीये गावात दरड आल्याने नव्याने केलेल्या तपासणीत १९ नव्या गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे महाड तालुक्यातील दरड संभाव्य गावांची संख्या आता ४९ वरून ६८ झाली आहे.

महाड तालुक्यात पारमाची या गावात २० वर्षांपूर्वी दरड कोसळली होती. त्यानंतर दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच राहिले. सन २००५ मध्ये तर मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवितहानी झाली होती. दासगाव, जुई, आणि कोंडीवते या गावात दरडी कोसळल्या होत्या. याचप्रमाणे तालुक्यात विविध ठिकाणी डोंगर भागात दरडी आल्या आहेत. सह्याद्रीवाडी, हिरकणीवाडी या गावांतून तर जमिनीला भेगा पडण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. याबाबत भूवैज्ञानिक शाखेकडून तालुक्यातील गावांची पाहणी करण्यात आली होती. यामध्ये महाडमधील ४९ गावांना दरडीचा धोका असल्याचे निरीक्षण करण्यात आले. त्यानुसार गेली काही वर्षे महाड महसूल प्रशासन या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा म्हणून या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याचे सांगत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -