घरताज्या घडामोडीपंकजा मुंडेंचं हेलिकॉप्टर फिरल्याशिवाय आमदार, खासदार होतात का?, जानकरांचा हल्लाबोल

पंकजा मुंडेंचं हेलिकॉप्टर फिरल्याशिवाय आमदार, खासदार होतात का?, जानकरांचा हल्लाबोल

Subscribe

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे हेलिकॉप्टर फिरलं नाही तर आमदार, खासदार होतील का हो? असं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलं आहे. तसेच महादेव जानकर मेला तरी पंकजा ताई तुला सोडत नाही काळजी करु नको असेही महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांना मदत करण्याचे आपलं काम आहे. गोपीनाथ मुंडेंनी वंचितांना एकत्रित करुन मोट बांधली आता पंकजा मुंडे यांना आपण मदत केली पाहिजे तसेच सावरगाव कोणी बांधले असा सवाल करत सावरगावचे निर्माते गोपीनाथ मुंडे असल्याचे महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. सत्ता येईल जाईल आपली माणसं जिवंत राहिली पाहिजे. आमची अवलाद भीक मागण्याची नाही अशी फटकेबाजी आपल्या भाषणात महादेव जाणकर यांनी केली आहे.

दसरा मेळाव्याच्या निमित्त भगवान गडावर आयोजित कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी महादेव जानकर यांनी पंकजा मुंडेंना मरेपर्यंत सोडणार नाही असे सांगितले आहे. जर गोपीनाथ मुंडे नसते तर हा मेंढे राखत फिरत असतो असे महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. जाणकर यांनी म्हटलं आहे. नेत्याला सांभाळण्याचे काम माझं आणि तुमचे आहे. ज्यो गोपीनाथ मुंडेंनी वंचितांची फळी बांधली त्यांना आता मदत करण्याचे आपलं काम आहे. पंकजा मुंडेंना मदत करण्याचे काम आपलं असल्याचे महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेलिकॉप्टर फिरल्याशिवाय खासदार होतात का?

व्यासपीठावर उपस्थित असलेल्या खासदार सुजय विखेंकडे पाहून जाणकर यांनी पंकजा मुंडेचे हेलिकॉप्टर फिरल्याशिवाय आमदार, खासदार होतात का हो? असा सवाल केला आहे. या कठीण काळात आपली लोकं जिवंत राहिली पाहिजे. आम्ही भीक मागणार नाही तर आ आमच्या हिंमतीवर उभ राहण्याचा प्रयत्न करु असे जानकर यांनी म्हटलं आहे.

जाणकर मेला तरी सोडणार नाही

महादेव जानकर यांनी पंकजा मुंडेंना “हा महादेव जानकर मेला तरी तुला सोडत नाही काळजी करु नको” असे म्हटले आहे. गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर केलं आहे. हेलिकॉप्टरमधून फिरून नेता येत नाही. नेतेपद विकत घेता येत नाही त्याला रक्त्तात असावं लागतं. नकल करणे म्हणजे नेता नाही. खरं ते खरं आणि खोटं ते खोटं असे महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मेंढे राखत बसलो असतो

भगवान बाबाला जात नव्हती आणि त्या गोपीनाथ मुंडेला जात नव्हती. मुंडे नसते तर महादेव जानकर मेंढे राखत बसला असता आणि दुसऱ्या जातीचा आमदार ऊस तोडायला गेला असता असे महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.

नेता ओळखायला शिका

महादेव जानकर यांनी ओबीसी आरक्षणावरुन राज्य सरकार आणि केंद्रावर टीका केली आहे. ओबीसींची अवस्था काय झाली आहे. केंद्र सरकार डेटा नाही आणि राज्य म्हणते पैसे नाही. का ओबीसींचे जनगणना करत नाही. का लपवून ठेवण्यात येत आहे. ओबीसीची जनगणना जातीनिहाय झाली पाहिजे. जातीचा विकास करण्यासाठी जतीनिहाय जनगणना करण्याची गरज आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना कोणाचेही सरकार असूद्या आमची एकच विनंती आहे की, हिसका दाखवण्याचे काम करा, ओबीसीच्या नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहा असे आवाहन महादेव जानकर यांनी केलं आहे.


हेही वाचा : मेळावा कोणत्याही पक्षाचा नव्हे तर मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा – प्रीतम मुंडे


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -