घरताज्या घडामोडीछत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते, महादेव जानकरांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते, महादेव जानकरांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज देखील ओबीसी होते असे वक्तव्य महादेव जानकर यांनी केलं आहे. यापुर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक निर्माण केली असे वक्तव्य केले होते. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद निर्माण झाला होता. तर आता छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी असल्याचे वक्तव्य महादेव जानकर यांनी केल्यामुळे नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

महादेव जानकर परभणीतील जिल्ह्यातील गंगाखेडमधील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. जानकर यांनी ओबीसी आरक्षणावरुन बोलताना आमदारावंही निशाणा साधला आहे. मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो आणि मुस्लिमांनाही आरक्षण देतो, मुस्लिमांवर अन्याय खूप आहे. कुठे गॅरेज बघितले की मुस्लिम, अंब्याचे दुकान पाहिले का मुस्लिम, कोंबडीचे दुकान मुस्लिम, त्यांचा कोणी कलेक्टर नाही. ते आपले टोपी घालून फळं विकतात आणि आपण त्यांनाच शिवी देतो. हिंदू भिकारी आणि मुस्लिम भिकारी परंतु राज्य चालवणारा तिसरा असतो ही गोष्टी लक्षात ठेवली पाहिजे असे महादेव जानकर म्हणाले.

- Advertisement -

ओबीसी आरक्षणावरुन बोलताना महादेव जानकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते असे सांगितले आहे. ते म्हणाले की, प्रथम शाहू महाराजांनी ओबीसींना आरक्षण दिले. मराठ्यांना आरक्षण होते परंतु नंतर का गेले? शिवाजी महाराजही ओबीसी होते. तेव्हा काही लोकांना वाटले की, आपण मोठे आहोत आपल्याला काही गरज नाही म्हणून आम्हाला आरक्षण नको आता काय अवस्था कशी झाली आहे आपण पाहत आहोत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंदू व्होट बँकवरुन वक्तव्य केलं होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशात हिंदू व्होट बँक विकसीत केली आणि अलीकडच्या काळात अटल बिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वांनी त्यावर कळस चढवला असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होते.

- Advertisement -

हेही वाचा : महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालून दाखवा, संजय राऊतांचे कर्नाटक सरकारला आव्हान

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -