Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रमराठवाडाMahadev Jankar : ...पण मी 5 मिनिटे तरी पंतप्रधान होईन; महादेव जानकरांनी...

Mahadev Jankar : …पण मी 5 मिनिटे तरी पंतप्रधान होईन; महादेव जानकरांनी केला दावा

Subscribe

धाराशिव : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी संध्याकाळी 6 वाजता थंडावल्या. यादिवशी सकाळपासून प्रचार सभांची रेलचेल पाहायला मिळाली. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून आपला उमेदवार जिंकावा, यासाठी प्रत्येक पक्षाने प्रचारासाठी जोर धरला होता. यावेळी एका प्रचारसभेदरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या विधानाची चांगलीच चर्चा रंगली होती. ‘मी आयुष्यात मुख्यमंत्री होणार नाही. मात्र, पाच मिनिटं का होईना देशाचा पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही,’ असे विधान त्यांनी यावेळी केले. (Mahadev Jankar statement on CM ship and Prime ministership in Bhum)

हेही वाचा : Assembly Polls 2024 : प्रचाराच्या तोफा थंडावल्या; पुढील 36 तास ‘अर्थ’पूर्ण घडामोडींचे 

- Advertisement -

“भूम आणि परांड्याच्या जनतेला माझी विनंती आहे की, ही संधी गमाऊ नका. या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष नक्कीच खाते उघडणार आहे. रासपचे आमदार निवडून येणार आहेत. पण, तुमचा राज्यात पहिला मान असणार आहे. कारण तुम्ही मला एक सर्वाधिक मतदान केले होते. तुमच्यामुळे मला मान्यता मिळाली. आज देशभर बोलतो तर भूम परांड्याच्या जनतेच्या जोरावर बोलतो.” असे म्हणत महादेव जाणकार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, “जेव्हा माझा झेंडा घ्यायला कोणी नव्हतं, तेव्हा तुम्ही मला मतदान केले होते. त्यामुळे आताही तुम्ही मला संधी द्या. मी आयुष्यात मुख्यमंत्री होणार नाही. पण, पाच मिनिटे का होईना, देशाचा पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही.” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. ” मी मुख्यमंत्री कधीच होणार नाही. पण पंतप्रधान झाल्यानंतर भूम परांड्यातून हेलिकॉप्टर घेऊन नक्की फिरेल. ते देखील झेंडा आणि चिन्हही माझे असेल. दुसऱ्याच्या पक्षावर नाही,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महादेव जाणकर यांनी यावेळी भाजप आणि काँग्रेसवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, “भाजप गद्दार पक्ष आहे आणि काँग्रेसही तसाच पक्ष आहे. काँग्रेसदेखील चांगले नाहीत. आज सांगतात आम्ही पाणी दिले, वीज दिली, विमा दिला. लाडक्या बहि‍णींना पैसे दिले. मग हे पैसे काय त्यांचे आहेत का? ते पैसे त्यांचे नाहीत. हे सर्व पैसे जनतेचे आहेत. पण, निवडणूक आल्यानंतरच मुख्यमंत्री शिंदेंना लाडक्या बहि‍णींची कशी आठवण झाली? आधी 5 वर्ष कुठे होतात?” असा सवाल त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, “भाजप काय करतो? तर माणसात माणूस ठेवत नाही आणि पक्षात पक्ष ठेवत नाही. शरद पवारांनी पक्ष काढला तर त्यांचा घरात फोडाफोड केली, त्यानंतर उद्धव ठाकरेंबाबतीतही तेच केले.” असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली.

- Advertisement -

Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -