घरमहाराष्ट्रघरचे सामान शिफ्ट करताय?, घ्या एसटीची मदत

घरचे सामान शिफ्ट करताय?, घ्या एसटीची मदत

Subscribe

कोरोनाकाळात प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला होता. यातून मार्ग काढण्यासाठी एसटीने मालवाहतूकीची सेवा सुरू केली. कोरोनानंतरही एसटीची मालवाहतूक जोरात सुरु आहे. आता घरातील सामान शिफ्ट करण्यासाठीही एसटी धावत आहे.

कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आसल्याने एसटी महामंडळाने मालवाहतुकीतून आर्थिक स्त्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार गेल्या वर्षापासून एसटी महामंडळाने मालवाहतूक सुरू केली. प्रवासी गाड्यांमध्ये काहीअंशी बदल करुन मालवाहतुकीसाठी गाड्या तयार करण्यात आल्या आहेत. या मालवाहतुकीमुळे एसटी महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नात भर पडली आहे. गोंदिया जिल्ह्यात एसटीला मालवाहतुकीमधून 1 लाख 66 हजार रुपयांचे उत्पन्ना मिळाले आहे.

- Advertisement -

या वस्तूंची होते वाहतूक –

एसटीने मालवाहतून किराणा, ऑटोमोबाईल, कटलरी, स्टेशनरी, शेतीमाल, सिमेंट, आणि अन्य मालाची वाहतूक केली जाते. करार असल्याने महाबीजच्या बियाणे आणि कृषीमालाची वाहतूकही केली जाते. याशीवाय बालभारतीच्या शालेय पुस्तकांचा पुरवठा एसटीच्या मालवाहतुकीद्वारे करण्यात आला.

- Advertisement -

व्यापाऱ्यांचे प्राधान्य –

खासगी मालवाहतुकीच्या तुलनेत एसटी मालवाहतुकीचे दर परवडत असल्याने व्यापारी  एसटीच्या मालवाहतुक सेवेला प्राधान्य देत आहेत.बदल्या किंवा इतर कारणांमुळे एका गावातून दुसऱ्या गावात घर शिफ्ट करायचे असल्यास खासगी मालवाहतुकीचा आधार घ्यावा लागतो. या ग्राहकांसाठी आता एसटीच्या मालवाहुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -