घरताज्या घडामोडीमहालक्ष्मी रेसकोर्स मुलुंड डम्पिंग ग्राऊंडला नेणार?, पालिकेची राज्य सरकारला विनंती

महालक्ष्मी रेसकोर्स मुलुंड डम्पिंग ग्राऊंडला नेणार?, पालिकेची राज्य सरकारला विनंती

Subscribe

मुंबई: मुंबईतील महालक्ष्मी येथील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या रेसकोर्सला मुलुंड डम्पिंग ग्राऊंड व परिसरातील जागेत स्थलांतरित करण्यात येणार आहे. तर रेसकोर्सच्या जागेवर ‘थीम पार्क’ बनविण्यात येणार आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेकडून राज्य सरकारकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू आहे. मात्र रेसकोर्ससाठी हे सरकारी जागेचाच वापर करण्यात यावा. मात्र खासगी जागा खरेदी करून उगाच एखाद्या बिल्डरला आर्थिक लाभ देण्यास आमचा विरोध असेल, असे माजी मंत्री व युवसेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे.

महालक्ष्मी येथील रेसकोर्सची ७० टक्के जागा ही राज्य सरकारची तर ३० टक्के जागा ही मुंबई महापालिकेच्या मालकीची आहे. त्यामुळे रेसकोर्सच्या जागेबाबत महापालिकेला सर्वस्वी निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. तर शासनच त्या जागेबाबत योग्य तो निर्णय घेऊ शकते.

- Advertisement -

रेसकोर्सच्या जागेत थीम पार्क उभारण्याची संकल्पना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली होती. त्याबाबत त्यांनी घोषणाही केली होती. मात्र त्याबाबत गेल्या काही वर्षात काहीच हालचाल झाली नाही. उलट रेसकोर्स ज्या वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला सांभाळण्यासाठी दिले आहे, त्याचा लीज करार दहा वर्षांपूर्वीच संपुष्टात आलेला आहे. मात्र राज्य सरकार व पालिकेने अद्याप कोणताही नवीन करार टर्फ क्लबसोबत केलेला नाही. क्लबवाले सध्या न्यायालयात गेले आहेत. आता राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.


हेही वाचा : कल्याणमधील सेंचुरी रेयान कारखान्यातील कर्मचारी गायब, कामगार वर्गात भीतीचे वातावरण

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -