घरताज्या घडामोडीसीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या नवे दर?

सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या नवे दर?

Subscribe

राज्यात दिवसागणिक होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. परंतु सर्व सामान्यांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महानगर गॅस लिमिटेड कंपनीने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. नवे दर हे आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

महानगर गॅसकडून सीएनजीच्या दरात ६ रुपये प्रति किलो तर जीएनजीच्या दरात ४ रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता १७ ऑगस्टपासून नवे दर लागू होणार आहेत. या दर कपातीमुळे मुंबईत सीएनजी ८० रुपये प्रति किलो इतका होईल. तर पीएनजी ४८.५० प्रति किलो इतका होईल.

- Advertisement -

सध्याचे हे दर पेट्रोलच्या तुलनेत ४८टक्के स्वस्त असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तर, पीएनजी हा एलपीजीच्या तुलनेत १८ टक्के स्वस्त असल्याचा दावा देखील कंपनीनं केला आहे. महानगर गॅस कंपनीकडून २ ऑगस्टला सीएनजी ६ रुपयांनी आणि पीएनजी ४ रुपयांनी वाढवला होता. परंतु त्यामध्ये आता कपात करण्यात आली असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मागील महिन्यात देशात सतत वाढणाऱ्या महागाईमुळे नागरिक त्रस्त झाले होते. यात मुंबईकरांना महागाईचा भडका सहन करावा लागला. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मुंबईत सीएनजीचा दर चार रुपयांनी तर पीएनजी तीन रुपयांनी महाग झाला होता. मुंबईत सीएनजीसाठी ८० रुपये प्रति किलो तर पीएनजीसाठी ४८.५० रुपये मोजावे लागले होते.

- Advertisement -

हेही वाचा : अवघ्या १२ मिनिटांत दहिसर ते मीरा रोड प्रवास, वाहतूक कोंडीच्या समस्येतून होणार सुटका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -