घरमहाराष्ट्रमहागाईच्या काळात आनंदाची बातमी! महानंदचे दूध दोन रुपयांनी स्वस्त

महागाईच्या काळात आनंदाची बातमी! महानंदचे दूध दोन रुपयांनी स्वस्त

Subscribe

देशासह राज्यात महागाईने उच्चांक गाठला आहे. मांसाहार महाग झाला आहे. भाजीपाला महाग झाला आहे. अशा महागाईच्या काळात महानंद डेअरीने एक लिटर दूधाचे भाव दोन रुपयांनी कमी केले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. ग्राहकांना दिलासा देण्याबरोबरच विक्री वाढवण्यासाठी निर्णय घेतल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

महानंद डेअरीचे दूध आजपासून दोन रुपयांनी स्वस्त झालं आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात ग्राहकांना दिलासा देण्याबरोबरच आपली घसरलेली विक्री वाढवण्यासाठी प्रति लिटर दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची कपात केली आहे. राज्यात मागील वर्षी दुधाचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे अमूल, महानंदसह सर्वच डेअरींनी दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ करत ४८ रुपये केला होता. त्यानंतर राज्यात आता पुन्हा लॉकडाऊन झाल्याने महानंदच्या दुधाचे एकूण वितरण दीड लाखापर्यंत खाली आले आहे. ती वाढवण्याबरोबरच आर्थिक अडचणीतील ग्राहकांना दिलासा देण्यासाठीच प्रतिलिटर दुधाचा दर ४८ रुपये केल्याचे महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार यांनी सांगितलं.

- Advertisement -

महानंदने दुधाचा दर कमी करतानाचा विक्री वाढावी म्हणून वितरकांसाठीही खास योजना आणली आहे. त्यानुसार सध्या विक्री केल्या जात असलेल्या दुधामध्ये १५ टक्क्यांची वाढ केल्यास त्यांना सध्या दिल्या जात असलेल्या प्रति लिटरच्या कमिशनमध्ये ८५ पैशांची वाढ केली जाणार आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -