घरताज्या घडामोडीCoronaVirus: राज्यातील अतिरिक्त १० लाख लिटर दूध महानंदा स्वीकारणार

CoronaVirus: राज्यातील अतिरिक्त १० लाख लिटर दूध महानंदा स्वीकारणार

Subscribe

कोरोनाचा प्रादुर्भाव जगासोबत देशात आणि राज्यात झाला आहे. याचा मोठा परिणाम दूध व्यवसायावर होत असून राज्यात असलेल्या लॉकडाऊनमुळे दुधाची विक्री थांबली आहे. परिणामी अनेक सहकारी दूध संघांना एक दिवस दूध पुरवठा बंद ठेवावा लागत आहे. याचा फटका ग्रामीण भागातील शेतकरी आणि दूध उत्पादकांना बसत असून या सर्वांना दिलासा देण्यासाठी राज्यात निर्माण होणारे अतिरिक्त १० लाख लिटर दूध महानंदा खरेदी करणार आहे, अशी माहिती महानंदचे अध्यक्ष रणजित देशमुख यांनी दिली आहे.

तात्काळ दोनशे कोटी मंजूर

देशमुख म्हणाले, अतिरिक्त दूधाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर राज्य सरकारने यासंदर्भात लक्ष घातल्यानंतर महासंघाने तातडीने यासंबधीचा प्रस्ताव दुग्धविकास खात्यास सादर केला. नंतर दुग्धविकास खात्याने दिलेल्या या प्रस्तावाला तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रस्तावाला मान्यता देत तात्काळ दोनशे कोटी मंजूर केले. याकामी दुग्धविकास मंत्री सुनील केदार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महानंदाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी पाठपुरावा केला.

- Advertisement -

राज्यात दररोज दहा लाख लिटर दुधाची पावडर तयार होणार

या २०० कोटी मंजुरीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघामार्फत जिल्हा दूध संघ आणि तालुका सहकारी दूध संघ यांचे अतिरिक्त दूध हे शासन दराप्रमाणे पंचवीस रूपये हमीभावाने संकलित करण्याचे निश्चित केले आहे. संकलित दूध हे महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचा पावडर प्लॅन्टद्वारे दुधभूकटी करणार आहोत. सहकारी दूध संघ आणि खाजगी दूध संघाचे भुकटी प्रकल्प आहेत. त्यांच्याबरोबर करार करून दूध पावडर तयार करून घेतली जाईल. यामुळे राज्यात दररोज दहा लाख लिटर दुधाची पावडर तयार होणार आहे. ही योजना येत्या दोन-तीन दिवसात सुरू होईल. दूध पावडर साठवण्याची शासनाने व्यवस्था केली आहे. ज्यावेळी दूध व्यवसायाची परिस्थिती सुधारेल त्यावेळी शासन पावडरची विक्री करून त्यातून मिळणारी रक्कम राज्य शासनास परत करणार आहे.

राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला

कोरोना संकटाच्या काळात महाआघाडीचे सरकार शेतकरी बांधवाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. देशव्यापी लॉकडाऊनमुळे दुधाची विक्री थांबली आहे. त्यामुळे राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा सहकारी दूध संघ आणि तालुका सहकारी दूध संघाकडेही अतिरिक्त दूध शिल्लक राहत आहे. त्यामुळे या संघाकडे दुधसंघ बंद ठेवण्याची वेळ येऊ नये, म्हणून यावर मार्ग काढण्यासाठी राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी यावर मार्ग काढण्यासाठी महानंदास प्रस्ताव तयार करण्यास सांगितला होता, असे रणजितसिंह देशमुख यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – आयसोलेशन वार्डसाठी ‘मदरसा’ देणार; मौलाना हारिस यांची घोषणा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -