घरमहाराष्ट्रमहामानवाला अभिवादन! चैत्यभूमीवर उसळला जनसागर, दर्शनासाठी रीघ

महामानवाला अभिवादन! चैत्यभूमीवर उसळला जनसागर, दर्शनासाठी रीघ

Subscribe

मुंबई – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६६ वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भीम अनुयायी मुंबईत दाखल झाले आहेत. पहाटेपासून भीम अनुयायांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली आहे. त्यामुळे दिवसभरात आज चैत्यभूमीवर ओघ राहिलच.

चैत्यभूमीवर पुस्तकांचे मोठया प्रमाणात स्टॉल्स लागलेले असतात. यंदा ३०० स्टॉल्स लागले आहेत. ज्याच्या विविध भागांतून नामवंत प्रकाशन संस्थांनी यात सहभाग घेतला आहे. आंबेडकर, बुद्ध, यांसह पुरोगामी विचारधारेची लाखो पुस्तके येथे उपलब्ध आहेत.

- Advertisement -

चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी, भन्ते मोठ्या संख्येने दादर, शिवाजी पार्क परिसरात आले आहेत. कोरोना कालावधीतील वगळता मुंबई महापालिकेतर्फे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार, सालाबादप्रमाणे यंदाही चैत्यभूमी व दादर शिवाजी पार्क परिसरात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायी यांच्यासाठी तात्पुरता निवारा, शामियाना, व्ही.आय.पी. कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, स्नानगृहे, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, विद्युत व्यवस्थेसह भ्रमणध्वनी चार्जिंग सुविधा इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

त्याचबरोबर चैत्यभूमीतील आदरांजलीचे मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून समाजमाध्यमांद्वारे देखील थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती, उप आयुक्त (परिमंडळ रमाकांत बिरादार आणि जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली आहे.

- Advertisement -

महापालिकेतर्फे उपलब्ध विविध सेवासुविधा

  • चैत्‍यभूमी येथे शामियाना व व्‍ही.आय.पी. कक्षासह नियंत्रण कक्ष, चैत्‍यभूमी प्रवेशद्वाराजवळ व सूर्यवंशी सभागृह मार्ग या ३ ठिकाणी रुग्‍णवाहिकेसहीत आरोग्‍यसेवा.
  • १ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्‍या मंडपात तात्‍पुरता निवारा.
  • शिवाजी पार्क परिसरात पुरेशा संख्येतील फ‍िरती शौचालये.
  • पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या नळांची व्‍यवस्‍था.
  • टँकर्संचीही व्यवस्था.
  • संपूर्ण परिसरात विद्युत व्‍यवस्‍था.
  • अग्निशमन दलामार्फत आवश्‍यक ती सेवा.
  • चौपाटीवर सुरक्षारक्षकासहीत बोटीची संपूर्ण परिसरात व्‍यवस्‍था.
  • मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण.
  • फेसबुक, व्टीटर, यूट्यूब या समाजमाध्यमांवर पालिकेच्या अधिकृत खात्यांद्वारे ६ डिसेंबर रोजी थेट प्रक्षेपण
  • विचारप्रवर्तक पुस्तकांसह वैविध्यपूर्ण बाबींच्या विक्रीसाठी स्‍टॉल्‍स्ची रचना.
  • दादर (पश्चिम) रेल्‍वे स्‍थानकाजवळ आणि एफ उत्तर, चैत्‍यभूमी व छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर (पूर्व) स्‍वामिनारायण मंदिराजवळ नियंत्रण कक्ष व माहिती कक्ष.
  • राजगृह येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष.
  • स्काऊट गाईड हॉल येथे भिक्‍कू निवासाची व्‍यवस्‍था.
  • मैदानात धुळीचा त्रास रोखण्‍यासाठी पायवाटांवर आच्छादनाची व्‍यवस्‍था.
  • अनुयायांना मार्गदर्शनाकरीता १०० फूट उंचीचे चैत्‍यभूमी परिसर येथे निदर्शक फुग्‍याची व्‍यवस्‍था.
  • भ्रमणध्वनी चार्जिंगकरीता शिवाजी पार्क येथे पॉइंटची व्‍यवस्‍था.
  • फायबरच्‍या तात्‍पुरत्‍या स्‍नानगृहाची व्‍यवस्‍था.
  • रांगेतील अनुयायांसाठी तात्‍पुरते छत असलेल्‍या बाकड्यांची व्‍यवस्‍था.
  • शिवाजी पार्क व्‍यतिरिक्‍त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा आणि लोकमान्‍य टिळक टर्मिनस (कुर्ला टर्मिनस) येथे देखील तात्‍पुरत्‍या निवा-यांसह पुरेशा संख्येने फि‍रती शौचालये
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -