घरमहाराष्ट्रMahaparinirvan Din: आनंदराज आंबेडकर म्हणतात चैत्यभूमीवर या, बाळासाहेब म्हणतात येणं टाळा

Mahaparinirvan Din: आनंदराज आंबेडकर म्हणतात चैत्यभूमीवर या, बाळासाहेब म्हणतात येणं टाळा

Subscribe

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर जाणारच, तसंच आंबेडकरी जनतेला चैत्यभूमीवर येण्याचं आवाहन केलं होतं. मात्र याउलट वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी चैत्यभूमीवर येणं टाळा, असं आवाहन भीम अनुयायांना केलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट कर चैत्यभूमीवर येण्याचं टाळआ असं आवाहन केलं आहे. ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबईला यावं की नाही अशी विचारणा केली जात आहे. सध्या रेल्वे पूर्णपणे चालू झालेली नाही. एसटीचा ही संप सुरू आहे. सोबतच कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबद्दल अंदाज कोणालाही येत नाही आहे. अशा परिस्थितीत आपण येणं टाळावं असं माझं आवाहन आहे, असं बाळासाहेब आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

“आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाहून बाबासाहेबांना मानवंदना देण्याचं काम करूया. सोबतच आंबेडकरवादी राजकीय पक्षालाच आम्ही तारण्याचं काम करू आणि आंबेडकरी पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करु हा संकल्प सगळ्यांनी करूया,” असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाल्या.

- Advertisement -

आनंदराज आंबेडकर काय म्हणाले होते?

रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आंबेडकरी जनतेला चैत्यभूमीवर येण्याचं आवाहन करत राज्य सरकारचे आवाहन धुडकावून लावले होते. आंबेडकरी समाज हा मृत्यूला कधीही भ्यायलेला नाही, असे ठणकावून सांगतानाच येत्या ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आम्ही लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर जाणारच, असं आनंदराज आंबेडकर यांनी ठणकावून सांगितलं होतं.

सर्व सण, उत्सव, राजकीय पक्षांचे सर्व कार्यक्रम पुन्हा सुरू झाले असून ते सुरळीत पार पडत आहेत. मग बौद्ध जनतेचा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि महापरिनिर्वाण दिनीच कोरोनाचे नवे अवतार कसे उभे ठाकतात? असा सवाल आनंदराज यांनी केला होता. तसंच, राज्य सरकारने घरात बसून बाबासाहेबांना अभिवादन करावं असं फक्त आवाहन केलं आहे. पण आंबेडकरी समाज हा बंदी- मज्जावाला कधीही जुमानत नाही, हे त्यांनी पक्कं लक्षात ठेवावं, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला होता.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -