घरमहाराष्ट्रMahaparinirvan Diwas : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रेरणादायी ठरेल - राज्यपाल

Mahaparinirvan Diwas : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रेरणादायी ठरेल – राज्यपाल

Subscribe

मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिननिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी चैत्यभूमी येथे जाऊन पुष्पचक्र अर्पण करून  केले. इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक बनविण्यात येत आहे. हे स्मारक प्रेरणादायी ठरेल, असा आत्मविश्वास राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिका जनसंपर्क विभागामार्फत आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी यावेळी भेट दिली.

राज्यपाल रमेश बैस  म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माता आहेत. गरीब, दलितांचे, सर्वच घटकांचे ते प्रेरणास्थान आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कट्टर योद्धा, समाजसुधारक होते. त्यांनी शिक्षणाला अधिक महत्व दिले. तसेच, त्यांनी संविधानामधून महिलांना समान अधिकार दिले. जगात कोटी लोक जन्म घेतात नंतर ते जगाचा निरोप घेतात. मात्र लोके त्यांची आठवण काढतात, त्यांचे स्मरण करतात जे समाज, देशासाठी काही महत्वाचे, उल्लेखनीय कार्य केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गरीब, दलित समाजासाठी महत्वाचे व चांगले कार्य केले.”

- Advertisement -

हेही वाचा – Actor Kiran Mane : ‘यांच्यापेक्षा देखणा ‘हीरो’ मी आयुष्यात पाहिलेला नाही’; किरण मानेंची पोस्ट व्हायरल

यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशीष शेलार,आमदार प्रवीण दरेकर, आमदार कालिदास कोळंबकर,मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आदींनी पुष्पचक्र अर्पण करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागामार्फत आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी यावेळी भेट दिली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -