घरमहाराष्ट्रनागपूरदेवेंद्र फडणवीसांनी सांगितला किस्सा; म्हणाले, 'महापौर'ही सावरकरांचाच

देवेंद्र फडणवीसांनी सांगितला किस्सा; म्हणाले, ‘महापौर’ही सावरकरांचाच

Subscribe

 

नागपूरः स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मराठी भाषा समृद्ध केली. महापौर आणि विधान मंडळ सारखे शब्द सावरकरांनी दिले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील कार्यक्रमात दिली.

- Advertisement -

मृत्यूंजयाचा आत्मयज्ञ कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. मी महापौर झालो तेव्हा मला कोणी तरी येऊन विचारलं की, तुम्ही महापौर झालात. तुम्हाला माहीत आहे का महापौर शब्द कुठून आला. मी म्हणालो आमच्या व्याख्येत लिहिला आहे. तर त्यांनी मला सांगितलं हा शब्द सावरकांनी दिला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले, सावरकारांनी मराठी समृद्ध केली. महापौर, विधान मंडळ सारखे शब्द त्यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती सावरकारांनी लिहिली. जातीभेद नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सावरकर दूरदृष्टी नेता होते. जो इतिहास लपवला जात होता, तो पुढे आणण्याचे काम सावरकरांनी केले. त्यांचे लिखाण प्रकाशित होऊ नये यासाठी इंग्रजांनी प्रयत्न केले. पण त्यांचे हस्तलिखित कसे रोखणार. सावरकरांचे हस्तलिखित लोकांपुढे आले. अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनीही यातना भोगाव्या लागत आहेत.

- Advertisement -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कॉंग्रेसने कधीच स्विकारलं नाही. ते नेहमीच त्यांचा अपमान करत आले आहेत. राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अपमान करत असतात. पण मी त्यांचा आभारी आहे. ते म्हणत असतात की मी सावरकर नाही. सावरकरांच्या केसासारखेही सावरकर होऊ शकत नाहीत, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

सावरकरांना स्वांतत्र्यवीर उपाधी देण्यात आलेल्या घटनेला पुढच्या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. अशावेळी ही कांदबरी प्रकाशित होत आहे. या कादंबरीचा ऑडिओ तयार करावा. त्याला लागणारे पैसे मी देतो, असे फडणवीस यांनी सांगितले.

सावरकर यांच्या जयंतीलाच नवीन संसद भवनचे उद्घाटन होत आहे, हा विलक्षण योग आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारच मानायला हवेत, असेही फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -