घरमहाराष्ट्रMaharaj Baraskar Vs Manoj Jarange: जरांगेंच्या 'त्या' गुप्त भेटींबाबत मोठा खुलासा; महाराज...

Maharaj Baraskar Vs Manoj Jarange: जरांगेंच्या ‘त्या’ गुप्त भेटींबाबत मोठा खुलासा; महाराज बारसकरांच्या आरोपांमुळे खळबळ

Subscribe

मराठा आंदोलक मनोज जरांगेंवर अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगेंवर अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. महाराज बारसकर यांनी केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. बारसकरांनी जरांगे पाटील हेकेखोर असल्याचं, तसेच एक नंबर नाटकी असल्याचं म्हटलं आहे. जरांगे लोकांची फसवणूक करत असल्याचंही त्यांनी म्हटलं. सोबतच जरांगेंच्या गुप्त बैठकांबाबतही खुलासा केला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Maharaj Baraskar Vs Manoj Jarange Big reveal on Jarange s those secret meeting Excitement due to Maharaj Baraskar s allegations )

बारसकर म्हणाले की, 23 डिसेंबरला गुप्त मिटिंग काहींसोबत मनोज जरांगे पाटील यांनी केली. मी त्याचा साक्षी आहे. रांजणगाव गणपती येथे उच्च पदस्थ अधिकारी यांच्यासोबत गुप्त मीटिंग केली. लोणावळा, वाशी येथे देखील समाजाला वगळून मीटिंग करण्यात आली. वाशी आंदोलन होईपर्यंत मी आंदोलक म्हणून सहभागी होतो, मात्र त्यांच्या मीटिंगवर माझा आक्षेप होता. जरांगेला काडीची अक्कल नाही. पंधरा मिनिटांत शासन निर्णय आणि अधिसूचना द्या म्हणे. अर्धवट ज्ञान बेकार असतं असं हेच म्हणतात, मग स्वत: चं काय? सगळ्या अधिकारी यांच्यासोबत हा मीटिंग घेत होता, असंही बारसकर यांनी यावेळी म्हटलं आहे. तसंच, जरांगेंचा एकेरी उल्लेखही त्यांनी केला आहे.

- Advertisement -

जरांगेपेक्षा देव मोठाय का?

जरांगेंची मुलगी म्हणजे माझ्या बापाच्या देव पाया पडेल. इतका अहंकार मुलांमध्येही आहे. सांगा हा देवापेक्षा मोठा आहे का? हा माझ्यावर आरोप करतो सरकार आणि भुजबळ यांचा माणूस. माझा आणि कोणाचा संबंध नाही. आरक्षण संबंध याने सांगतो. आजपर्यंत एकही पत्र सरकारला त्याने स्वत: दिलं नाही. रोज पलटी मारतो तो. सगळ्या मीटिंग कॅमेऱ्यावर करतो, असं बारसकर म्हणाले.

संताचा अपमान केला अन् वादाची ठिणगी पडली

मी जरांगेच्या प्रत्येक कृतीला साक्षी आहे. मी प्रसिद्धीसाठी किंवा पैशासाठी आरोप करतोय असं बिलकूल नाही. मी कीर्तनाचे वगैरे पैसे घेत नाही. आताच हे का झालं तर काही दिवसांपासून माझ्या मनातील खदखद व्यक्त केली. मला अनेक फोन येत आहेत, माझं काम सत्य सांगणं आहे. जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला. तो मी सहन करणार नाही. जरांगे यांना लोक पाणी प्या म्हणत होते, तेव्हा मी त्यांना पाणी पाजायला गेलो. मात्र तेव्हा त्यांना वाटलं माझ्या हातून पाणी प्यायल्याने, मी मोठा होईल म्हणून पाणी प्यायले नाहीत. मला तिथे म्हणाले संत फिंत गेले खड्यात असं म्हटल्याने तिथून माझा वाद सुरु झाल्याचं बारसकर म्हणाले.

- Advertisement -

(हेही वाचा: Maharashtra Politics : अजित पवार गटाने शरद पवारांचे आरोप फेटाळले, म्हणाले आमचीच बदनामी…)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -