घरताज्या घडामोडीअयोध्येच्या वादात महाराणा प्रताप सेनेची उडी, राजनंतर आदित्य ठाकरेंना नो एन्ट्री

अयोध्येच्या वादात महाराणा प्रताप सेनेची उडी, राजनंतर आदित्य ठाकरेंना नो एन्ट्री

Subscribe

राज्यात भोंगा विरूद्ध हनुमान चालिसा वाद सुरू असतानाच आता अयोध्या दौऱ्यावरून राजकीय क्षेत्रात तणावाचं वातावरण निर्माण होताना पहायला मिळत आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी अयोध्येला हजेरी लावली. अशातच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील येत्या १० जून रोजी अयोध्या दौऱ्याला जाणार आहेत. यामध्ये राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध दर्शवला आहे. अशातच आदित्य ठाकरेंना अयोध्येत घुसू देणार नाही, अशी धमकी महाराणा प्रताप सेनेने आदित्य ठाकरेंना दिली आहे.

भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना अयोध्येत येऊन दाखवावेच, त्यांना आम्ही पाय ठेऊन देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी शिवतीर्थ या निवासस्थानी मनसेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याबाबत चर्चा केली असून याबाबत प्रसार माध्यमांशी संवाद न साधण्याचा आदेश मनसेच्या नेत्यांना दिला आहे.

- Advertisement -

कुणी कितीही टोकाची भूमिका घेतली तरी घेऊ द्या. टोकाची भूमिका आम्हालाही घेता येते. एकाने गाय मारली म्हणून वासरू मारायचे नसते, असं सांगत आमचा अयोध्या दौरा ठरलेला आहे. राज ठाकरेंनी दौऱ्याची आधीच घोषणा केली आहे. आमची तयारीही सुरू आहे. त्यामुळे आम्ही जाणारच, असं मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.

जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत तोपर्यंत ते उत्तरप्रदेश, झारखंड, बिहारसह कोठेही ते येऊ शकत नाहीत. कोणी कधी पाप केले असेल तर ते भोगावे लागते असे आम्ही मानतो. पूर्व जन्मात केलेले पाप सुद्धा भोगावे लागते. आज ती व्यक्ती माझी चूक झाली हे दोन शब्द बोलायला तयार नाही. त्यामुळे राज ठाकरेंनी स्वप्नात रामाचे दर्शन करावे प्रत्यक्षात ते झारखंड, बिहार, उत्तरप्रदेशातील कोणत्याही जिल्ह्यात पाय ठेवू शकत नाहीत. आमचं प्रत्येक राज्यात बोलणं सुरू आहे, असं खासदार बृजभूषण सिंह म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, बृजभूषण सिंह यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अयोध्येच्या वादात महाराणा प्रताप सेनेने देखील उडी घेतली आहे. यावेळी आदित्य ठाकरेंना अयोध्येत घुसू देणार नाही, अशी धमकी महाराणा प्रताप सेनेने आदित्य ठाकरेंना दिली आहे. त्यामुळे आता शिवसेनेची पुढची भूमिका काय असणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : प्राण जाये पर वचन ना जाये, हेच आमचे हिंदुत्व – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -