राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; शुक्रवारी ४१६५ रुग्णांची नोंद

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मागील तीन दिवसांपासून कोरोनाच्या (Covid 19) नव्या रुग्णांचा आकडा ४ हजार पार जात आहे. अशातच आज राज्यात ४१६५ रुग्णांची नोंद झाली आहे.

India corona update 27,409 fresh COVID cases 82,817 recoveries, and 347 deaths in the last 24 hours

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मागील तीन दिवसांपासून कोरोनाच्या (Covid 19) नव्या रुग्णांचा आकडा ४ हजार पार जात आहे. अशातच आज राज्यात ४१६५ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील रुग्णांच्या तुलनेत मुंबईतील रुग्ण संख्या अधिक आहे. त्यानुसार आज मुंबईत यातील २२५५ रुग्ण हे मुंबईतील आहे आहे. (maharashtra 4165 corona patients registered and 3047 discharge)

राज्यात ४१६५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर ३०४७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ७७,५८,२३० जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९७.८६ टक्के झाले आहे. राज्यात आज कोरोनामुळे तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मृत्यूदर हा १.८६ टक्के इतका झाला आहे.

हेही वाचा – कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकार लवकरच घेणार ‘हा’ निर्णय

राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या (Corona Active Cases) देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण २१७४९ सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक असून, १३३०४ इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

देशात कोरोनाचे १२ हजार ८४७ नवे रुग्ण

भारतात १२ हजार ८४७ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाच्या संसर्गात सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे सरकारकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. तर दुसरीकडे जगभरात पसरलेल्या मंकीपॉक्स व्हायरसच्या धोक्यामुळेही आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.


हेही वाचा – औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेचे काम दर्जेदार करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश